Uttar Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: मॉलमध्ये मोठी दुर्घटना, शटरिंग अंगावर पडलं; ३ जणांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Accident: उत्तर प्रदेशच्या वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना घडली. शटरिंग अंगावर पडल्याने ३ कामगारांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला.

Priya More
  • वृंदावनमध्ये बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये शटरिंग कोसळले

  • शटरिंग कोसळून तीन कामगारांचा मृत्यू

  • ओमेक्स मॉलच्या बांधकामस्थळी घडली मोठी दुर्घटना

  • एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

उत्तर प्रदेशच्या वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना घडली. शटरिंग कोसळल्याने तीन कामागरांचा मृत्यू झाला. रुक्मिणी विहारमधील बांधकाम सुरू असलेल्या ओमेक्स मॉलमध्ये सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमध्ये एक कामगार गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.

ओमेक्स रुक्मणी विहार चौकाजवळ एका मॉलचे बांधकाम सुरु आहे. सकाळी ७ वाजताच्या सुमारास कामगार शटरिंग बसवण्याच्या कामात व्यस्त होते. अचानक शटरिंग तुटून खाली पडले. ते पडताच एकच गोंधळ उडाला. या शटरिंगखाली चार कामगार गाडले गेले. घटनास्थळी काम करणाऱ्या इतर कामगारांनी आणि कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरू केले. चौघांनाही ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. तोपर्यंत एका कामगाराचा मृत्यू झाला होता.

गंभीर जखमी झालेल्या ३ कामगारांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत दोघांनी प्राण सोडले. डॉक्टरांनी त्यांची तपासणी करत मृत घोषीत केले. तर एका कामगाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून आग्रा येथील एसएन मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, फक्त चार जण ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते. सर्वांना बाहेर काढण्यात आले. तिघांचा मृत्यू झाला असून एकाला आग्रा येथे पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या ३ वर्षांपासून बांधकाम सुरू आहे. तिथे दररोज सुमारे ५० मजूर काम करतात. अपघाताच्या वेळी तिथे ५ मजूर काम करत होते. त्यातील एक मजूर थोड्या वेळासाठी बाजूला गेल्यामुळे त्याचा जीव वाचला. जवळच्या रहिवाशांनी दिलेल्या माहितीवरून पोलिस घटनास्थळी पोहोचले. ही घटना नेमकी कशी घडली याचा तपास पोलिस सध्या करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: लंडनमध्ये युवराज खोपडे यांचा कुस्तीचा डंका

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

किचनमध्ये रोज होणाऱ्या ७ चुका, ज्या प्रत्येक महिलेने आवर्जून टाळाव्यात; आरोग्यावर होतात गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT