योगी सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील शाळा 15 ऑगस्टनंतर सुरु होणार Saam Tv
देश विदेश

योगी सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील शाळा 15 ऑगस्टनंतर सुरु होणार

उत्तर प्रदेशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गावर प्रभावी नियंत्रण केल्यानंतर, योगी सरकार (CM Yogi Adityanath) हळूहळू सर्व गोष्टी सामान्य करण्याचा प्रयत्न करीत आहे.

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेशातील कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संसर्गावर प्रभावी नियंत्रण केल्यानंतर, योगी सरकार (CM Yogi Adityanath) हळूहळू सर्व गोष्टी सामान्य करण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये आता योगी सरकार शाळा आणि महाविद्यालयं सुरु (Uttar Pradesh School Reopens) करण्याच्या तयारीत आहे. 15 ऑगस्टनंतर राज्यात महाविद्यालये आणि शाळा सुरु होण्याची शक्यता आहे.

कोरोना संसर्गामुळे सुमारे दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये अभ्यास सुरू करण्याची तयारी सरकारने केली आहे. राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी उच्च अधिकार्‍यांसोबत झालेल्या बैठकीत परिस्थितीचा आढावा घेताना निर्देश दिले की हायस्कूल आणि सर्व बोर्डांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

5 ऑगस्टपासून पदवी स्तरावरची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. माध्यमिक शैक्षणिक संस्थांमध्ये पदोन्नत झालेल्या विद्यार्थ्यांची भरती प्रक्रियाही या तारखेपासून सुरू होणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी या सर्वांचे वर्ग 16 ऑगस्टपासून सुरू करण्यास सांगितले आहे. याशिवाय, उच्च शिक्षण संस्थांमधील अभ्यास 1 सप्टेंबरपासून सुरू केला जाणार आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी टीम-09 सोबत बैठक घेतली त्यात त्यांनी शाळा आणि महाविद्यालय यांच्या संदर्भात चर्चा केली. आणि त्यानंतर ऑफलाईन शिक्षण सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात 16 ऑगस्टपासून 50 टक्के उपस्थितीमध्ये माध्यमिक आणि 1 सप्टेंबरपासून उच्च माध्यमिक शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक दिवस 50 टक्के विद्यार्थी शाळेत हजर राहतील तर उर्वरीत 50 टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेतील. सरकार लवकरच या संबंधीत मार्गदर्शक सुचना जारी करेल.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT