Viral Video Saam Tv
देश विदेश

रुग्णांच्या बेडवर, वॉर्डमध्ये, औषधांच्या टेबलवर उंदरांचा वावर; रुग्णालय प्रशासन झोपेत, VIDEO Viral

Viral Video: उत्तर प्रदेशमधील एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत रुग्णालयातील वाईट अवस्था दिसत आहे. रुग्णालयात अस्वच्छतेने रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh Hospital Viral Video:

उत्तर प्रदेशमधील एका सरकारी रुग्णालयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओत रुग्णालयातील वाईट अवस्था दिसत आहे. रुग्णालयात अस्वच्छतेने रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाचा भोंगळ कारभार दिसत आहे. याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हायरल व्हिडिओत (Viral Video)रुग्णालयात अस्वच्छता असल्याचे दिसत आहे. रुग्णालयात अनेक उंदीर, धूळ दिसत आहे. याचा त्रास रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे. रामपूर जिल्हा रुग्णालयात ही घटना घडली आहे. व्हिडिओत रुग्णालयात उंदीर पळताना दिसत आहे. रुग्णांच्या बेडवर उंदीर दिसत आहेत. तर उंदीर अंगावर येऊ नये म्हणून रुग्णांनी तोंडावर ब्लँकेट घेतले आहेत. रुग्णालयात जमिनीवर उंदीर धावताना दिसत आहे. व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

अनेकांनी रुग्णालयातील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. हे रुग्णालय रुग्णांसाठी अंत्यत धोकादायक असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. उंदीर रुग्णांना चावू शकतो किंवा त्याच्या विष्टेमुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागू शकतो.

या व्हिडिओवर नागरिकांनी संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 'रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरु आहे'. 'अस्वच्छतेमुळे रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो', अशा कमेंट्स या व्हिडिओवर केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT