Uttar Pradesh News Saam TV
देश विदेश

Uttar Pradesh News : मुस्लीम महिला आमदाराच्या मंदिर प्रवेशानंतर गंगाजलने शुद्धीकरण; हनुमान चालिसाचंही पठण

SP mla Saiyada Khatoon : एका दिवसानंतर, हिंदू संघटनेच्या सदस्यांनी आणि नागरिकांनी गंगाजलाने मंदिर धुतले. हनुमान चालिसाचे पठण केले आणि सपा नेत्याच्या विरोधात घोषणाबाजी केली.

प्रविण वाकचौरे

Uttar Pradesh News :

मुस्लीम आमदाराने मंदिरात प्रवेश केल्याने मंदिर गंगाजलाने धुतल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात समोर आला आहे. समाजवादी पक्षाच्या आमदार सय्यदा खातून यांनी रविवारी सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एका मंदिराला भेट दिली होती.

सय्यदा खातून या बलवा गावात कार्यक्रमाला गेल्या असताना साम्य माता मंदिरात गेल्या होत्या. मात्र त्यांच्या जाण्याच्या एका दिवसानंतर, हिंदू संघटनेच्या सदस्यांनी आणि नागरिकांनी गंगाजलाने मंदिर धुतले. हनुमान चालिसाचे पठण केले आणि सपा नेत्याच्या विरोधात घोषणाबाजी केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साम्या माता मंदिर हे भाविकांचे श्रद्धेचे केंद्र आहे. लोक भक्तीभावाने मंदिरात येतात ज्याचा स्थानिक आमदाराने अनादर केला. त्या मांसाहारी आहेत आणि त्यांच्या भेटीमुळे या ठिकाणाच्या पावित्र्यावर परिणाम झाला, असं भाजपच्या स्थानिक नेत्याने म्हटलं. (Uttar Pradesh News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील एक मंदिर हिंदू संघटनेचे सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी गंगाजलाने धुतले. मंदिराचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. संभाव्य संघर्षाची शक्यता टाळण्यासाठी एक पथक परिसरात गस्त घालत आहे. या घटनेबाबत अद्याप कोणतीही तक्रार करण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सय्यदा खातून या काय म्हणाल्या?

आमदार सय्यदा खातून यांनी याबाबत म्हटलं की, रविवारी बलवा गावातील कार्यक्रमाला साम्य माता मंदिर प्रशासाने मला आमंत्रित केले होते. मी सर्व धर्मांचा आदर करते. याशिवाय मी लोकप्रतिनिधी आहे. मंदिर असो की मशीद, मला निमंत्रण आले तर मी तिथे नक्कीच जाईन.

यूपीमध्ये अशा प्रकारची ही पहिलीच घटना नाही. 2018 मध्ये, भाजपमधील दलित महिला आमदाराच्या प्रवेशानंतर हमीरपूरमधील एका मंदिराला गंगाजलाने शुद्ध करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT