Gas Leak In Hospital 
देश विदेश

Gas Leak: मेडिकल कॉलेजमध्ये गॅस गळती; नागरिकांना श्वास घेण्यास त्रास, रुग्ण अन् नातेवाईकांची धावपळ

Gas Leak In Hospital : शाहजहांपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात गॅस गळतीमुळे गोंधळ उडाला. घटनेनंतर रुग्णांना ताबडतोब वॉर्डाबाहेर काढण्यात आले.

Bharat Jadhav

उत्तर प्रदेशच्या शाहजहांपूरमध्ये राजकीय मेडिकल कॉलेजमध्ये गॅस गळती झाल्यानं हॉस्पीटलमध्ये गोंधळ उडाला. रुग्ण आणि नातेवाईकांची धावपळ उडाली. घटनेनंतर रुग्णांना ताबडतोब वॉर्डाबाहेर काढण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गॅस गळतीमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. तर गॅसची गळती झाल्यानं लोकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. वायू गळती झाल्याची माहिती झाल्यानंतर अग्निशामक दलाचं पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

मेडिकल कॉलेजच्या ऑपरेशन थिएटरमध्ये गॅस गळती झाल्यानं धावपळ उडाली. वायू गळती झाल्यानंतर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर रुग्ण हॉस्पीटलच्या बाहेर पळू लागले. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेश कुमार यांनी याप्रकरणी माहिती दिली. राजेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॉमा सेंटरमधील ओटीमधून पर्मालाइनचा वास येत असल्याने रुग्णांना अडचणी येत होत्या.

प्राचार्य डॉ. राजेश कुमार म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या गंभीर रुग्णाचा आजारपणामुळे मृत्यू झाला. त्यांनी लोकांना अफवांकडे लक्ष देऊ नका असे आवाहन केलंय. गॅस गळतीची माहिती मिळताच, रुग्णांना घेऊन रुग्णांचे कर्मचारी पळून जाऊ लागले. ज्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला. दरम्यान आता परिस्थिती सामान्य आहे आणि सर्व रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालयात परत हलवण्यात आलीय.

डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी घटनेची पुष्टी केली आणि सांगितले की, ऑपरेशन थिएटरमधून (ओटी) गॅस गळती झाली होती. घटनेची माहिती मिळवली जात आहे. या घटनेत कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली नाहीये. तसेच घटनास्थळी अग्निशामक दल आणि पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: हार्दिक पांड्या विरोधात पुणे न्यायालयात याचिका दाखल होणार

Navi Mumbai : रीलच्या नावाखाली उच्छाद! नवी मुंबईत आगरी कोळी समाजाच्या पुतळ्याचा अपमान; पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत हायकोर्टानं दिला महत्वाचा आदेश, केंद्र सरकारलाही धाडली नोटीस

SCROLL FOR NEXT