Pm Modi News Saam Tv
देश विदेश

Pm Modi News: वाराणसीत PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, तरुणाने ताफ्यासमोर घेतली उडी

PM Modi in Varanasi: वाराणसीत PM मोदींच्या सुरक्षेत मोठी चूक, तरुणाने ताफ्यासमोर घेतली उडी

Satish Kengar

PM Modi in Varanasi:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठी चूक झाल्याची बातमी समोर येत आहे. वाराणसीतील रुद्राक्ष केंद्राबाहेर ही घटना घडली. येथून पंतप्रधान नुकतेच विमानतळाकडे रवाना झाले होते. दरम्यान, त्यांच्या ताफ्यासमोर एका तरुणाने उडी मारली.

हा तरुण पंतप्रधानांच्या गाडीपासून जेमतेम 10 फूट अंतरावर होता. पोलिसांनी धाव घेऊन त्याला ताब्यात घेतलं. एसपीजी त्याची चौकशी करत आहे. हा तरुण भाजपचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तो गाझीपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं समजतं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, एका कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी वाराणसी येथे पोहोचले होते. रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटरमधून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान मोदी विमानतळाकडे रवाना झाले. दरम्यान, गाझीपूर येथील एक तरुण त्यांच्या ताफ्यासमोर आला आणि त्याने अचानक उडी मारली.  (Latest Marathi News)

तरूणाने जिथून उडी मारली तेथून पंतप्रधान मोदींची गाडी अवघ्या 10 फूट अंतरावर होती. या तरुणाला ताफ्यासमोर उडी मारताना पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्या तरुणाला पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांच्या चौकशीत तरुणाने सांगितले की, तो सैन्य भरतीची तयारी करत आहे.

पोलिसांना या तरुणाकडे एक फाईलची सापडली आहे. या तरुणाने पोलिसांना सांगितले की, यापूर्वी सैन्य भरतीसाठी शारीरिक चाचणी पूर्ण केल्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीत निवडण्यात आले होते. मात्र त्याला अद्यापही नोकरीत रुजू करून घेण्यात आलं नाही. त्यामुळे तो पंतप्रधानांना याबाबत विनंती करण्यासाठी तिथे गेला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये संत गाडगेबाबा इंजिनिअरिंग कॉलेजच्या गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

पक्ष बदलणाऱ्या खासदार- आमदारांना चाप बसणार; पक्षांतर रोखण्यासाठी कपिल सिब्बलांनी सुचवला 'मास्टरप्लॅन'

Manoj Jarange: २४ तासांत दुसऱ्यांदा पोलिसांनी परवानगी नाकारली, तरी मनोज जरांगे मुंबईत येण्यावर ठाम

Periods Pain: मासिक पाळी उशीरा येते? वेदना सहन होत नाहीत? मग PCOD नाही असू शकतो 'हा' आजार

Ganpati Naivedya Recipe : नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळं काहीतरी! गणरायासाठी बनवा स्वादिष्ट शेवयांची उकडवाटी

SCROLL FOR NEXT