up news  - Saam Tv
देश विदेश

UP News : घरात नवरा-बायको आणि २ मुलांचा आढळला मृतदेह; पोलिसांनी दार उघडताच परिसरात खळबळ

सीतापूर जिल्ह्यातील बिश्वन कोतवाली परिसरातील शहरात गॅस स्फोटात दोन मुलांसह एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh News : उत्तर प्रदेशच्या सीतापूर जिल्ह्यातून मोठं वृत्त समोर आलं आहे. सीतापूर जिल्ह्यातील बिश्वन कोतवाली परिसरातील शहरात गॅस स्फोटात दोन मुलांसह एका जोडप्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सीतापुरमधील एक कुटुंब शनिवारी रात्री खोलीत गाढ झोपले होते. थंडीपासून बचाव होण्यासाठी त्यांनी पेट्रोमॅक्स जाळून झोपले होते. त्यामुळे वायुगळती आणि गुदमरून कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नेमकं काय घडलं?

झज्जर येथे राहणारा आसिफ (४०) एक मदरशात शिकवत होता. शनिवारी आसिफ त्याची पत्नी आणि दोन मुलासह खोलीत झोपला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी दीडच्या सुमारास त्याचा मित्र आसिफच्या घरी आला. त्याने दार ठोठावले. मात्र, त्याने बऱ्याच वेळा ठोठावल्यानंतरही उघडले नसल्याने त्याला संशय आला. त्यानंतर त्याने पोलिसांना माहिती दिली.

पोलीस घटनास्थळी पोहचून दरवाजा तोडला. त्यावेळी चौघांचे मृतदेह पोलिसांना दिसले. तसेच त्यावेळी एलपीजीचाही उग्र वास येत होता. त्यांच्याजवळ पेट्रोमॅक्स जवळच ठेवण्यात आला होता. त्याचा उपयोग थंडीपासून बचाव करण्यासाठी केला जातो. घटनास्थळी पेट्रोमॅक्स गॅस पूर्ण संपला होता. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबाचे मृतदेह आढळल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT