Uttar Pradesh Fire Saam Tv
देश विदेश

Uttar Pradesh: भदोहीमध्ये दुर्गापूजा मंडपाला आग; 3 जणांचा मृत्यू, 64 जण होरपळले

जखमींवर वाराणसी आणि प्रयागराज येथील रुग्णालयात उपचार सुरु

वृत्तसंस्था

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) भदोही जिल्ह्यात रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भदोही जिल्ह्यातील दुर्गा पूजा मंडपात रात्री उशिरा भीषण आग लागली. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दुर्गापूजा मंडपात आरती सुरू होती, त्यावेळी ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. दुर्गापूजा मंडपात लागलेल्या या आगीत सुमारे 64 जण होरपळले असून तर तिघांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर जखमींना उपचारासाठी वाराणसी आणि प्रयागराज येथे हलवण्यात आले आहे.

शॉर्ट सर्किटमुळे लाग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मंडपाला आग लागली तेव्हा सुमारे 300 लोक तिथे उपस्थित असल्याची माहिती समोर येत आहे. आग एवढी भीषण होती की, त्यात 64 जण होरपळले. 64 जळालेल्यांपैकी 42 जणांना उपचारासाठी वाराणसीला पाठवण्यात आले आहे. याशिवाय तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. बहुतांश महिला आणि लहान मुले आहेत.

भदोही जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 10 लोकांना वरमसी येथील विभागीय रुग्णालयात आणि पाच जणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चार जणांना उपचारासाठी प्रयागराज येथे नेण्यात आले आहे. औराईमध्ये 18 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 15 जणांना वाराणसी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनास्थळाच्या आजूबाजूच्या लोकांनी आगीचे लोळ पाहताच अग्निशमन दलाला तसेच पोलीस आणि प्रशासनाला याबाबद माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी होरपळलेल्या लोकांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. आगीचे कारण तपासले जात आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फुले दिले की फुलेच मिळतात, कुणी टीका केली, तरी शांत राहायचं; जॅकी श्रॉफ असे का म्हणाले?

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

SCROLL FOR NEXT