MP Rajveer Singh Diler Death: Saamtv
देश विदेश

Rajveer Singh Diler : धक्कादायक! भाजपच्या विद्यमान खासदाराचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

MP Rajveer Singh Diler Death: भारतीय जनता पक्षाचे हाथरस लोकसभा मतदा संघाचे विद्यमान खासदार राजवीर दिलेर यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने समर्थकांसह कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Gangappa Pujari

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच भारतीय जनता पक्षासाठी एक दुखःद बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे हाथरस लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार राजवीर दिलेर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने समर्थकांसह कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

हाथरसमधील भाजप खासदार राजवीर सिंग दिलर यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. २०१९ मध्ये हाथरस लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र यावेळी पक्षाच्या हायकमांडने त्यांना तिकीट दिले नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आणि तळागाळातील त्यांच्या कार्यासाठी ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांच्या अकाली निधनाने दु:ख झाले आहे, त्यांच्या निधनाने पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मोदींनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

कोण आहेत राजवीर दिलेर?

राजवीर दिलर हे मूळचा अलिगढचे रहिवासी होते. 2017 मध्ये भाजपने त्यांना इगलस विधानसभेतून उमेदवार म्हणून उभे केले आणि विक्रमी मतांनी विजयी होऊन ते विधानसभेत पोहोचले. 2019 मध्ये लोकसभा निवडणूक येताच त्यांना राजेश दिवाकर यांचे तिकीट कापून उभे केले आणि त्यांनी 260208 मतांनी निवडणूक जिंकली होती.

यावेळी भारतीय जनता पक्षाने त्यांचे तिकीट रद्द केले आणि त्यांच्या जागी राज्य सरकारचे महसूल मंत्री अनुप वाल्मिकी यांना उमेदवारी दिली. दरम्यान, या मतदारसंघासाठी येत्या 7 मे ला मतदान होणार आहे. पण त्याआधीच राजवीर दिलेर यांच्या निधनामुळे भाजपला मोठा झटका बसला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही दिलेर यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tithal Beach : पावसाळ्यात 'तिथल' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

'Bigg Boss 19'च्या सदस्याने नॅशनल TVवर दिली प्रेमाची कबुली; गुडघ्यावर बसून केला प्रपोज, पाहा रोमँटिक VIDEO

मुंबईकरांसाठी गुड न्यूज! ठाण्यावरून थेट गेट वे ऑफ इंडियाला जा, तयार होतोय नवा भुयारी मेट्रो मार्ग; सर्वाधिक फायदा कुणाला?

Jio Recharge Plan: कमी खर्चात जास्त सुविधा! जिओचा 70 दिवसांचा धमाकेदार रिचार्ज प्लॅन, वाचा फायदे

SCROLL FOR NEXT