Agra Crime News Saam Tv
देश विदेश

Agra Crime News: फेमस होण्याच्या नादात तरुणींन उचलं आत्महत्येचं पाऊल, मेटाकडून आला "Emergency Call"

Instagram Crime News : फक्त लाइक्स, फॉलो आणि कमेंट्स मिळवण्यासाठी ही मंडळी सोशल मीडियावर अनेक विचित्र गोष्टी करताना दिसतात.

कोमल दामुद्रे

आगरा : सोशल मीडियाचा वापर हल्ली प्रचंड प्रमाणात वाढलेला पाहायला मिळतो. हल्ली लहान मुलांपासून वयोवृद्धापर्यंत प्रत्येकालाच सोशल मीडियांचं वेड जरा जास्त लागलं आहे. फक्त लाइक्स, फॉलो आणि कमेंट्स मिळवण्यासाठी ही मंडळी सोशल मीडियावर अनेक विचित्र गोष्टी करताना दिसतात. असाच एक प्रकार आगरा येथे घडला आहे.

इंस्टाग्रामवर फॅालोव्हर्स वाढवण्याच्या नादात तरुणीने चक्क आत्महत्या करतानाचा व्हिडीओ अपलोड केला. त्यानंतर व्हिडीओला (Video) लाइक्स व कमेंट्स येऊ लागल्या, तेव्हा मेटाच्या (Meta) यूएसए कार्यालयातून यूपी पोलिसांच्या सोशल मीडिया सेलवर अर्लट मेसेज पाठवण्यात आला.

जिल्हा सोशल मीडिया सेलला सदर घटनेची खबर लागताच कॉनस्टेबल विमल कुमार, आशीष शर्मा आणि शालिनी यांनी तरुणीच्या लोकेशनच्या दिशेने धाव घेतली,परंतु तेथे पोहोचल्यावर तरुणी सुरक्षीत असल्याचे दृश्य समोर आले.

पोलिसांनी (Police) व्हि़डीओबद्दल चौकशी केली असता तरुणीने आपण एर्नजीच्या गोळ्या घेतल्याचे सांगीतले. तसेच फेमस होण्यासाठी आपण हा व्हिडीओ बनवल्याचेही तिने सांगितले. हा सर्व प्रकार तिने लाइक्स आणि फॉलोव्हर्स मिळवण्यासाठी केला असेही सांगण्यात आले. या प्रकरणाची चौकशी पोलिस करतील याची कल्पना नव्हती असे देखील तिने कबुल केले. त्यानंतर पोलिसांकडून तरुणीची काऊंसिलींग करण्यात आली असून पोलिसांच्या चौकशी अंतर्गत तरुणी 12वी उत्तीर्ण असल्याचे समजले. वडीलांचे निधन झाले असून भाऊ खाजगी कंपनीत काम करत असल्याचे समोर आले.

सोशल मीडिया वर हे असे उपद्याप करणारी ही तरुणी काही पहिली नव्हती. याआधी आग्र्यातील चित्राहट मधील एका युवकाने 25 फेब्रुवारीला अशाच प्रकारे खोटी आत्महत्या करताना व्हिडीओ बनवला होता, त्यावेळी देखील मेटा कार्यालयातून पोलिसांना माहीती देण्यात आली होती. ऐन वेळी घटनास्थळी पोहोचून पोलिसांनी परिस्थिती हातळली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT