lucknow bus accident saam tv
देश विदेश

Bus Accident News : एक्स्प्रेस वेवर मृत्यूचं तांडव! ५० प्रवाशांना घेऊन जाणारी डबल डेकर बस उलटली

Uttarpradesh Lucknow Bus Accident News : लखनऊजवळ पूर्वांचल एक्सप्रेसवेवर बिहारकडे जाणाऱ्या स्लीपर बसचा भीषण अपघात होऊन ७ जणांचा मृत्यू तर ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले. घटनास्थळी बचावकार्य सुरू असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • लखनऊजवळ स्लीपर बसचा भीषण अपघात

  • ७ जणांचा मृत्यू, ४० हून अधिक प्रवासी जखमी

  • चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

  • पोलिस व बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू

नेपाळ येथील काठमांडू मधील बस अपघाताची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये ४० ते ५० जणांना घेऊन बिहारला जाणाऱ्या स्लीपर कोच बसचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून बचाव कार्य सुरु आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पोलीस तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस पानीपतहून प्रवाशांना घेऊन बिहारमधील अरहरियाला जात होती. पूर्वांचल एक्सप्रेसवेवर आल्यानंतर भरधाव वेगात जाणाऱ्या स्लीपर बसच्या चालकाचे बसवरचे नियंत्रण सुटले आणि ती उलटली. या भीषण अपघातानंतर परिसरात आणि बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी बसमध्ये अडकलेल्या लोकांना शर्थीच्या प्रयत्नानंतर बाहेर काढले. आतापर्यंत या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून ४० हून अधिक जण जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. गंभीर जखमींना सीएचसी गोसाईगंज येथून केजीएमयू ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले.

घटनास्थळी पोलिस दल पोहचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. पोलीस या घटनेचा तपास करत असून नेमकी ही घटना कशामुळे घडली याचा तपास करत आहेत. या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहरीत पडला

वीर सावरकर बदनामी प्रकरणात मोठी अपडेट; सात्यकी सावरकरांकडून अचानक तो अर्ज दाखल, कोर्टात नेमकं काय घडलं?

Rajpal Yadav: जेलमधून बाहेर आल्यानंतर राजपाल यादव पुन्हा कामाला लागला; हसवणाऱ्या कलाकराने रडत रडत सगळा घटनाक्रम सांगितला

SCROLL FOR NEXT