Lucknow Crime News Saam Tv
देश विदेश

Up Crime News: दारुच्या नशेत मित्राकडून मैत्रिणीची गोळ्या झाडून हत्या, नेमकं काय घडलं?

Lucknow Crime News: दारुच्या नशेत मित्राकडून मैत्रिणीची गोळ्या झाडून हत्या, नेमकं काय घडलं?

साम टिव्ही ब्युरो

Lucknow Crime News:

उत्तर प्रदेशमधील लखनौमध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने दारूच्या नशेत आपल्याच मैत्रिणीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली आहे. निष्ठा त्रिपाठी (23) असं हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.

लखनौ येथील चिन्हाट भागातील दयाल इमारतीमध्ये गुरुवार (21 सप्टेंबर) पहाटे 3.30 च्या सुमारास पार्टी दरम्यान ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निष्ठा त्रिपाठीचा मित्र आदित्य पाठक याने पार्टीसाठी तिला आपल्या घरी बोलावले होते. इतर अनेक मित्रही त्याच्या घरी पार्टीसाठी आले होते. रात्री उशिरापर्यंत आदित्यच्या घरी ही पार्टी सुरु होती. मात्र पार्टीदरम्यान काय घडले आणि तिला गोळी कशी लागली हे अद्याप समजू शकलेले नाही.  (Latest Marathi News)

गोळी लागल्यानंतर निष्ठाला तात्काळ नजीकच्या लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणातील मुख्य आरोपी आदित्य पाठक याला पोलिसांनी अटक केलं आहे. तसेच पार्टीत उपस्थित असलेल्या इतर लोकांची पोलीस चौकशी करत आहेत.

पोलिसांनी निष्ठा त्रिपाठीच्या मूत्यूची बातमी तिच्या कुटुंबियांना दिली. यावर निष्ठाच्या आई-वडिलांचे म्हणणे आहे की, त्यांच्या मुलीचे कोणाशीही वैर नव्हते. आपली मुलगी मद्यपान करते, हे त्यांनी मेनी केलं आहे. यातच पोलीस असता शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. ज्यामुळे तपासात मदत मिळू शकेल.

दरम्यान, निष्ठाची हत्या झालेल्या ठिकाणी दारूच्या बाटल्या ही जप्त करण्यात आल्या आहेत. हा गोळीबार दारूच्या नशेत झाला होता की, यामागं दुसरं कोणतं कारण होतं, याचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT