देश विदेश

Shocking: अजब प्रेमाची भयंकर घटना! सासूच्या प्रेमात वेडापिसा, सासऱ्याने रंगेहाथ पकडलं; जावयाने बायकोचा घेतला जीव

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशच्या कासगंजमध्ये एका विचित्र प्रेमकथेने थरार उडवला. जावयाच्या सासूवर वेड आल्यावर, प्रतिकार केल्यास त्याने पत्नीची हत्या केली, अशी धक्कादायक घटना घडली.

Dhanshri Shintre

  • कासगंजमध्ये एका पतीने सासूशी असलेल्या प्रेमसंबंधातून पत्नीचा खून केला.

  • मृत महिला शिवानी ही केवळ २४ वर्षांची होती.

  • आरोपी पती प्रमोद गुन्ह्यानंतर फरार झाला असून पोलीस शोध घेत आहेत.

  • या घटनेने परिसरात संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कासगंज जिल्ह्यातील सिद्धपुरा भागातील नागला पारसी परिसरात घडलेली एका तरुणीच्या खुनाची घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. २४ वर्षीय शिवानीचा मृतदेह तिच्या सासरच्या घराच्या व्हरांड्यात आढळून आला. तपासात समोर आले की, तिचा खून स्वतःच्या पतीने केला आहे. या घटनेत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पती प्रमोद आपल्या आईच्या वयाच्या सासू प्रेमवतीच्या प्रेमात वेडा झाल्याने या टोकाला गेला. घटनेची माहिती पोलिसांकडे पोहोचताच त्यांनी परिसराला वेढा घातला. मात्र आरोपी पती तेव्हाच घरातून पळून गेला होता.

शिवानी ही गंजदुंडवारा भागातील पलिया गावची रहिवासी होती. तिचे वडील नारायण सिंह यांनी सांगितले की, २०१८ मध्ये तिचे लग्न नागला पारसीतील रहिवासी आणि दिल्लीतील खाजगी नोकरदार प्रमोदशी झाले होते. लग्नानंतर अवघ्या सहा महिन्यांत प्रमोदचा त्याच्या सासूशी प्रेमसंबंध सुरू झाला. सुरुवातीला हा संबंध कुणालाच माहित नव्हता. पण प्रमोदचे वारंवार सासरच्या घरात येणे, पत्नीवर वाढलेला शारीरिक अत्याचार आणि त्यांचे आक्षेपार्ह वर्तन यामुळे कुटुंबाला संशय आला.

नारायण सिंह यांनी स्पष्ट केले की, जेव्हा त्यांनी या नात्याला विरोध केला तेव्हा प्रमोद आणि शिवानी दोघांनी त्यांच्यावर हात उगारला. शिवानी विवाहानंतर सतत शारीरिक आणि मानसिक त्रास भोगत होती. प्रमोद तिच्यावर वारंवार हिंसाचार करत होता. ज्यामुळे ती दुःखी झाली होती. तिच्या दोन लहान मुलांचा भारही तिच्यावर होता. एक अडीच वर्षाची आणि दुसरी केवळ सहा महिन्यांची. आता या दोन्ही बालकांनी आपल्या आईला गमावले आहे.

या खुनानंतर शिवानीच्या आई आणि तिच्या पतीचे काही गुन्हेगारी स्वरूपाचे फोटो समोर आले आहेत. ज्यामुळे तपास अधिक गंभीर वळणावर गेला आहे. पोलिसांनी शिवानीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले असून, प्रमोद आणि प्रेमवतीचा शोध तीव्र करण्यात आला आहे. या नातेसंबंधातून उभ्या राहिलेल्या कौटुंबिक संघर्षाने अखेर शोकांतिका घडवली आणि परिसरात भीती व संतापाची लाट पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतकऱ्याचे उभे केळीचे पीक जमीन दोस्त

डायबिटीजमध्ये किवी खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' फळ ठरेल फायदेशीर

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

Actress Bath Video Leak: अभिनेत्रीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ लीक', टिव्ही शोमध्ये घडला भयानक प्रकार

SCROLL FOR NEXT