crime news Saam TV
देश विदेश

Crime News : संतापजनक! धावत्या कारमध्ये तरुणीवर सामूहिक अत्याचार; यमुना महामार्गावरील खळबळजनक घटना

उत्तर प्रदेशच्या यमुनावर महामार्गावर तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh Crime : उत्तर प्रदेशच्या यमुनावर महामार्गावर तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. तरुणी नोएडावरून फिरोजाबादला जात होती, त्यावेळी घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, तरुणी नोएडाच्या सेक्टर ३७ मधून रात्री साडे आठ वाजणाच्या सुमारास फिरोजाबादला जाण्यासाठी शेअर टॅक्सीमध्ये बसली. टॅक्सी यमुना महामार्गावर आल्यानंतर सोबतचे प्रवासी तरुणीसोबत गैरवर्तवणूक करू लागले.

आग्रा येथील कुबरेपूर भागात रात्री १ वाजण्याच्या सुमारास चारचाकीमधील तरुणीला बळजबरीने झुडपात घेऊन गेले. त्यानंतर आरोपींनी तरुणीसोबत पहाटे ४ वाजेपर्यंत आळीपाळीने अत्याचार केला.

पीडित तरुणी रडत रडत लोकांना मदतीसाठी याचना करत होती. मात्र, थंडी आणि धुक्यामुळे लोकांनी तिचा आवाज ऐकू गेला नाही. अत्याचार केल्यानंतर आरोपींनी तरुणीला रिक्षात बसवून फिरोजाबादला पाठवून दिले.

दरम्यान, तरुणी एत्मादपूरमध्ये रिक्षातून उतरून सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलीस स्थानकात पोहोचली. पोलिसांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी सर्व माहिती ऐकून घेतली. त्यानंतर महामार्गाच्या टोलवरील सीसीटीव्ही फुटेज घेऊन आरोपींचा तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे

पोलीस आयुक्त डॉ. प्रीतिंदर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. तरुणीचा या प्रकरणी आणखी विचारपूस सुरू आहे. या प्रकरणात आणखी खुलासे आल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल'.

दरम्यान, या घटनेनंतर नोएडामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकारानंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. तरुणीवर सामूहिक अत्याचार झाल्यानंतर उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritiya 2026: अक्षय तृतीयेला सोनं खरेदीसाठी शुभ मुहूर्त कोणते? आताच वाचून घ्या

Sunday Horoscope : पार्टनरला मनातलं सांगून टाका; ५ राशींच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू होणार

काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळला; नगरसेविकेने बड्या नेत्याला कानफटवलं

Political News: भाजपला मोठा धक्का, माजी केंद्रीय मंत्री स्थापन करणार नवा पक्ष; राजकारणात खळबळ

महाराष्ट्रात आणखी एक उष्मघाताचा बळी; काही जिल्ह्यात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार

SCROLL FOR NEXT