Uttar Pradesh Crime News  Saam TV
देश विदेश

Crime News : दिल्लीच्या महिलेवर उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार; अपहरणानंतर २ दिवसांपासून सुरू होते अत्याचार

गाझियाबादच्या नंदग्राम परिसरात एका महिलेवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला.

साम टिव्ही ब्युरो

गाझियाबाद : दिल्लीला (Delhi) लागून असलेल्या गाझियाबाद शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. गाझियाबादच्या नंदग्राम परिसरात एका महिलेवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला. नराधमांनी सुरूवातीला महिलेचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर दोन दिवस अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी ५ जणांविरोधात गुन्हा नोंदविला असून यापैकी ४ जणांना अटकही केली आहे. (Uttar Pradesh Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३६ वर्षीय पीडित महिला दिल्लीतील नंदनगरी भागातील रहिवाशी आहे. ती नंदग्राम परिसरात राहणाऱ्या आपल्या भावाला भेटण्यासाठी आली होती. दरम्यान, तेथून परतत असताना ५ आरोपींनी तिचे अपहरण तिला (Crime News) निर्जनस्थळी नेले. त्यानंतर आरोपींनी दोन दिवस पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला.

नराधम आरोपी इतक्यावरच थांबले नाही, तर त्यांनी पीडितेच्या तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉडही घातला. या भयंकर कृत्यानंतर आश्रम रोडजवळ पीडितेला बेशुद्ध अवस्थेत फेकून आरोपींनी पळ काढला. पीडित महिला रस्त्याच्या कडेला एका पोत्यात आढळली होती, तेव्हाही रॉड तिच्या शरीरातच होता.

दरम्यान, रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पोत्यात महिला आढळून आल्यानंतर त्यांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिस तातडीने घटनास्थळी रवाना झाले. पीडित महिलेला दिल्लीच्या जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिनू, शाहरुख, जावेद, ढोला, औरंगजेब ऊर्फ झहीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापैकी ४ जणांची चौकशी सुरू आहे. चौकशीत आरोपींची या महिलेशी आधीच ओळख असल्याचे समोर आले. आरोपी आणि पीडित महिलेमध्ये मालमत्तेचा वाद होता. याच वादातून आरोपींनी हे कृत्य केल्याची प्राथामिक माहिती पोलिसांनी दिली.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: पगार अन् पेन्शनवाढीसाठी पुढचा आठवडा महत्त्वाचा! कर्मचाऱ्यांनी 'या' तारखेकडे ठेवा लक्ष

Maharashtra News Live Update: मंत्री उदय सामंत निकटवर्गीय सचिन सानप पुणे शिक्षक मतदार संघातून उभे राहणार यावर ठाम.

खासगी क्लासच्या सहलींसाठी कडक नियमावली करा; मुख्यमंत्र्यांकडे कुणी केली मागणी?

15 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

CJP Shivaji Park Protest: अभिजीत दीपकेंसह 500 जणांविरोधात FIR; शिवाजी पार्क आंदोलनप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT