Uttar Pradesh Crime News Saam Tv
देश विदेश

Shocking : मैत्रिणीनं केला घात, खोटं सांगून घरी नेलं अन् भावाच्या हवाली केलं; १० वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Uttar Pradesh Crime News : उत्तर प्रदेशमध्ये १०वीच्या विद्यार्थिनीवर तिच्या मैत्रिणीच्या भावाने बलात्कार केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Alisha Khedekar

  • मैत्रिणीच्या भावाकडून १० वीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार

  • पीडितेला खोटं सांगून मैत्रिणीने घरी नेलं

  • आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

  • उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना

उत्तर प्रदेशात मैत्रीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने जवळच्या मैत्रिणीवर स्वतःच्या भावाकडून शारीरिक अत्याचार करवून घेतले. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पोळी पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या शाळेत वार्षिक समारंभ होता. त्यानिमित्त ती शाळेत गेली असता तिच्या मैत्रिणीने खोटा बनाव रचून पीडित मुलीला आपल्या घरी घेऊन गेली. त्यानंतर पीडितेला नशेच्या गोळ्या देऊन तिला बेशुद्ध करण्यात आले. याचा फायदा घेऊन मुलीच्या मैत्रिणीच्या भावाने तिच्यावर बलात्कार केला.

यानंतर पीडित मुलीला जेव्हा शुद्ध आली तेव्हा ती तिच्या घरी होती. तिने तिच्या वडिलांना घडलेली हकीकत सांगितली. पीडितेच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत संबंधित आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. पीडितेच्या वडिलांनी म्हटले की, ती जेव्हा घरी आली तेव्हा ती नशेत होती.

तिच्या एका मित्राने तिला घरी आणून सोडलं. घरी आल्यानंतर तिची मनस्थिती ठीक नसल्याने आम्ही तिची विचारपूस केली. तेव्हा तिने घडलेली घटना सांगितली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्न निर्माण करण्यात आले आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT