Yogi Adityanath Saam Tv
देश विदेश

योगी आदित्यानाथ यांनी दिल्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा, म्हणाले...

मागच्या आठवड्यात मशिदीवरील भोंगे उतरवल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केले होते.

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश: आज ६२ वा महाराष्ट्र दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. लखनऊमध्ये महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) साजरा होत असल्याने त्यांनी पत्र लिहून आनंद व्यक्त केला आहे. उत्तर प्रदेशमधील महाराष्ट्र मंडळाला पत्र देऊन योगींनी शुभेच्छा दिल्या आहेत. मागच्या आठवड्यात मशिदीवरील भोंगे उतरवल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगींचे कौतुक केले होते.

आज योगींनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. योगींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की वैविध्यपूर्ण नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रातील तमाम जनतेला 'महाराष्ट्र दिना'च्या हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती आणि भरभराट होवो हीच सदिच्छा.

दरम्यान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही सकाळी मराठीत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व जनतेला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याने अभूतपूर्व योगदान दिले आहे. इथल्या लोकांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महाराष्ट्रातील जनतेच्या समृद्धीसाठी मी प्रार्थना करतो असे ट्वीट करत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, गृहमंत्री अमित शाह यांनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राज्यात आज सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला गेला. राज्यातील अनेक नेत्यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी पोलीस परेड पार पडल्या आहेत. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र या वेगळ्या राज्याची स्थापना झाली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Celebrates Ganpati 2026 : फुलांची सजावट, मोदकांचा नैवेद्य अन् ढोल ताशांचा गजर; सेलिब्रिटींच्या घरी गणरायाचे आगमन | VIDEO

IAS Officer Transfer: बदल्यांचा धडाका सुरूच! 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; कुणाची कुठे नियुक्ती?

Maharashtra News Live Update: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी विवीध बाप्पाचं पूजन

Dalimb vs Sitaphal: डाळिंब की सीताफळ? आरोग्यासाठी कोणते फळ अधिक फायदेशी, जाणून घ्या ७ फरक

Salt Intake : पुरुषांनी आणि महिलांनी दिवसाला किती मीठ खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

SCROLL FOR NEXT