Uttar Pradesh Train Incident Saam Digital
देश विदेश

Uttar Pradesh Train Incident: बरेलीत धावत्या ट्रेनसमोर फेकलं तरुणीला, खुद्द मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल

CM Yogi Adityanath Take Action : तरुणीने हात पाय गमावले असून तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Uttar Pradesh Train Incident

छेडछाडीला विरोध केल्यामुळे दोन तरुणांनी एका १७ वर्षांच्या मुलीला ट्रेनसमोर फेकून दिलं. यात या तरुणीने हात पाय गमावले असून तिच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या आहेत. उत्तर परदेशमधील बरेलीत घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित पोलीस स्थानकाचे प्रभारी निरीक्षक, प्रभारी आणि बीट कॉन्स्टेबलला निलंबित केलं आहे. सदर तरुणीला ५ लाख रुपयांची आर्थिक मदत करताना विभागीय पातळीवर तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.

पीडित तरुणी कोचिंगवरून घरी परतत असताना ही घटना घडली. सध्या या तरुणीची प्रकृती चिंताजनक असल्याच डॉक्टरांनी सांगितलं. दरम्यान पोलिसांनी एका तरुणाला आणि त्याच्या वडिलांना अटक केली आहे. योगी आदित्यनाथ यांनी आदेश दिल्यानंतर पोलीस आयुक्त, आयजी यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन पीडित तरुणीची आणि तिच्या कुटुंबियांची विचारपूस केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी दलित समाजातील असून गावातील एक तरुण तिची मागच्या दोन महिन्यांपासून छेड काढत होता. कधीही कुठेही आपल्या मित्रांसह तो तरुण तिला अडवत असे. घरातील महिला गावची प्रमुख असल्यामुळे सुरुवातीला पीडित तरुणीने याबाबत कुटुंबियांना सांगण्याचं टाळलं. मात्र, दिवसेंदिवस हे प्रकार वाढतच गेल्यामुळे तिने सर्व प्रकार घरी सांगितला. मात्र, त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. चौकशीही केली नाही. त्यामुळे हा अनर्थ घडला आणि सदर तरुणीचा आता जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT