Uttar Pradesh Car Accident News  AI Image
देश विदेश

Accident News : देवदर्शनाला गेलेल्या मित्रांचा तो दिवस अखेरचा ठरला! भरधाव ट्रकच्या धडकेत ४ तरुणांचा मृत्यू; चार जखमी

Uttar Pradesh Waransi Car Accident News : वाराणसीजवळील प्रयागराज-वाराणसी महामार्गावरील रूपापूर येथे भीषण अपघात. भरधाव ट्रकची धडक बसल्याने ४ जणांचा मृत्यू, तर ४ जण गंभीर जखमी. ट्रकचालकाचा शोध सुरू.

Alisha Khedekar

  • उत्तर प्रदेशातील वाराणसीजवळ NH-19 महामार्गावरील रूपापूर गावाजवळ दुर्घटना

  • अपघातात चार तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर

  • भरधाव ट्रकने धडक दिल्याने अपघात

  • पोलीस पुढील तपास करत आहेत

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे सेल्फी काढण्यासाठी ब्रिजवर थांबणे तरुणांच्या जीवावर बेतले. प्रयागराज-वाराणसी महामार्गावरील (NH-19) रूपापूर गावाजवळ सोमवारी सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात ४ तरुणांचा मृत्यू झाला, तर अन्य ४ जण गंभीर जखमी झाले. विंध्याचल धाम येथे दर्शन घेऊन वाराणसीला परतणाऱ्या तरुणांच्या कारला भरधाव ट्रकने मागून धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आठ मित्र एका कारमधून प्रवास करत होते. ओव्हरब्रिजवर आल्यानंतर त्यांनी गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि सर्वजण खाली उतरले. यावेळी काही जण सेल्फी काढत होते, तर काही जण पुलाच्या कठड्याजवळ उभे होते. त्याचवेळी मागून आलेल्या वेगवान ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही जण पुलावरून खाली फेकले गेले, तर घटनास्थळी मृतदेह विखुरले गेले.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुलावरून तीन मृतदेह आढळले, तर आणखी एक मृतदेह पुलाखाली सापडला. खाली पडलेल्या एका तरुणासह अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांची नावे आनंद यादव (२५), आलोक मिश्रा (३०), प्रदीप सिंह (३६) आणि विद्वाआंशु यादव (३०) अशी आहेत. जखमींमध्ये कन्हैया यादव आणि निखिल कुमार यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळापासून सुमारे २०० मीटर अंतरावर ट्रक सोडून पळ काढल्याचे पोलिसांनी सांगितले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे. अपघातग्रस्त कारमध्ये प्रसादाचे डबे, नारळ आणि इतर पूजेचे साहित्य आढळल्याने तरुण देवदर्शन घेऊन परतताना हा अपघात झाल्याचे पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Hapus Price: फळांचा राजा पुण्यात दाखल, हापूस आंब्याची १ पेटी ४१,००० रुपयांना

Jio Offers : जिओचा नवा रिचार्ज प्लॅन लॉन्च! तब्बल ३ वर्ष चालणार, अनलिमिटेड कॉलिंग, डेटा अन् भरपूर फायदे; किंमतही समोर

Investment Fraud: गवंडी काम करणाऱ्या व्यक्तीने रचला ६७० कोटींचा महाघोटाळा; ७४०० लोकांना लावला लाखांचा चुना, बिंग कसं फुटलं?

Maharashtra News Live Update: जालन्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी-भाकर खाऊन सरकारचा निषेध

Diwali Muhurat Trading: दिवाळीत मोठा धमाका! शेअर बाजारात जोरदार तेजी, मुहूर्त ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स- निप्टीमध्ये मोठी वाढ

SCROLL FOR NEXT