Uttar Pradesh Bus Accident
Uttar Pradesh Bus Accident ANI
देश विदेश

Bus Accident : भयंकर! भरधाव ट्रकची प्रवासी बसला जोरदार धडक; भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू

साम टिव्ही ब्युरो

Uttar Pradesh Bus Accident : मध्यप्रदेशातील लखनऊ-बहराइच महामार्गावर आज सकाळी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने प्रवासी बसला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की बसमधील ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर १५ प्रवासी गंभीर जखमी झाले. यापैकी चार जणांचा प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

अपघातातील सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गंभीर जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार, सकाळी साडेचार वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस लखनौहून बहराइचला जात होती.

पहाटे धुक्यांमुळे महामार्ग दिसत नसल्याने ड्रायव्हरने बस (Bus Accident) महामार्गाजवळील एका ढाब्याजवळ उभी केली होती. या बसमध्ये जवळपास २० ते २५ प्रवासी होते. त्याचवेळी भरधाव वेगात येणाऱ्या एका ट्रकने बसला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की यामध्ये बसचा चक्काचूर झाला.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात आतापर्यंत ६ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर १५ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहे.

ट्रक चालक फरार

दरम्यान, या अपघातानंतर ट्रकचालक हा ट्रकसह घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तसेच ट्रकची ओळख पटवण्यासाठी पोलिस जवळपासच्या ढाब्यांवर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरेही तपासत आहेत. पोलीस अधिकारी डॉ. दिनेश चंद्र यांनी सांगितले की, बस ही रस्त्याच्या कडेलाच उभी होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेला ट्रक हा चुकीच्या दिशेने आला. त्यामुळे हा अपघात झाला.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nandurbar Water Shortage : नंदुरबार शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार; विरचक धरणातील पाणीसाठा घटला

Today's Marathi News Live : सांगलीत कॉफी शॉप तोडफोड प्रकरणी १६ जण ताब्यात

Swati Maliwal Assault Case: स्वाती मालीवाल मारहाण प्रकरण, संशयित आरोपी बिभव कुमार घरातून गायब

Wedding Viral Video: बापरे! भर मंडपात नवरा-नवरीची हाणामारी; VIDEO होतोय व्हायरल

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

SCROLL FOR NEXT