Uttar Pradesh Accident News Saam tv
देश विदेश

Uttar Pradesh Accident News: उत्तर प्रदेशात ट्रकचा भीषण अपघात, लहान मुलासह आठ जणांचा मृत्यू

Accident News: उत्तर प्रदेशात ट्रकचा भीषण अपघात, लहान मुलासह आठ जणांचा मृत्यू

Satish Kengar

Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधील दलपतपूर-काशीपूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहन आणि ट्रकच्या धडकेत एका लहान मुलासह 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 7 जणांहून अधिक लोक जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर (Accident) घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले. ही घटना उत्तर प्रदेशमधील भगतपूर पोलीस स्टेशन हद्दीतील खैरखाता गावातील काशीपूर करणपूर रोडची आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुरादाबाद जिल्ह्यातील या अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना योगी यांची दिल्या आहेत.  (Latest Marathi News)

योगी आदित्यनाथ यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जखमींना योग्य उपचारासाठी रुग्णालयात नेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच मदतकार्याला गती देण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

Rain Update : राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या भागातील हवामानाचा अंदाज काय? वाचा

Satara Tourism : महाराष्ट्रातील 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण पाहिलं का? पावसाळ्यात दिसते अधिकच सुंदर

Akshay Kumar : अक्षय कुमारचे भीतीदायक हास्य तर सैफ अली खानच्या डोळ्यात आग; 'हैवान'चा फर्स्ट लूक आऊट, रिलीज डेट काय?

SCROLL FOR NEXT