Viral News Saam Tv
देश विदेश

Viral News : घाईघाईत महिलेनं व्हिटामिनची गोळी समजून इअरपॉड गिळलं अन्...

Viral Video : एका महिलेने चक्क व्हिटामिनची गोळी समजून एअरपॉड गिळलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

USA News

सध्या सर्व जण धावपळीचे आयुष्य जगत आहेत. या धावपळीच्या जगात आपण खूप गोष्टी विसरतो. कधीकधी तर जेवायलाही विसरतो. जेवणानंतरची औषधं घ्यायला विसरतो. सकाळची औषधं संध्याकाळी घेतो. त्यामुळे खूप त्रास होतो. परंतु एका महिलेने चक्क व्हिटामिनची गोळी समजून एअरपॉड गिळलाय.

अमेरिकेत ही घटना घडली आहे. एका ५२ वर्षीय टीकटॉकरने इअरपॉड गिळले होते. तिने सोशल मीडियावर यासंबंधित मोठा खुलासा केला आहे. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, ही मजेशीर घटना तन्ना बार्करसोबत घडली आहे. तन्ना बार्कर ही प्रसिद्ध टिकटॉकर आहे. तिचे सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत. तिने हा मजेशीर किस्सा ऑनलाईन शेअर केला आहे.

तन्ना बार्कर आणि तिची मैत्रिण मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडली होती. तिने तिच्या मैत्रिणीशी गप्पा मारताना व्हिटामिनची गोळी घेतली. परंतु चुकून तिने गोळीऐवजी इअरपॉड गिळले. यासंबधित तिने सांगितले आहे.

'मी मॉर्निंग वॉकमध्ये अर्ध्या रस्त्यात असताना व्हिटामिनची गोळी घेण्याचे ठरवले. त्यानंतर गोळी घेतली. नंतर माझ्या घशात काहीतरी अडकल्यासारखे मला वाटले म्हणून मी अजून पाणी प्यायले. त्यानंतर मी तिथून निघाली. मी कानात इअरपॉड्स घालायला काढले तर ते इअरपॉड्स नसून विटामिनची गोळी होती. त्यानंतर मला लगेच समजले की, मी चुकून इअरपॉड्स गिळले आहे. आता माझ्या पोटात इअरपॉड्स आहेत'. असे तन्ना म्हणाली.

तिने घरी गेल्यावर घडलेली घटना पतीला सांगितली. परंतु तिच्या पतीने तिला ही गोष्ट कोणालाही न सांगण्यास सांगितले. परंतु तिने हा निर्णय तिच्या टिकटॉक फॉलोअर्ससोबत शेअर करण्याचा निर्णय घेतला.

तन्नाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. व्हिडिओवर भन्नाट प्रतिक्रियाही आल्या आहेत. 'जेव्हा इअरपॉड बाहेर येईन तेव्हा त्याची इअरपूड झालेली असेल.' 'मी विचार करतोय की, तुझी मैत्रिण तुला इअरपॉड खाताना बघत होती', अशा कमेंट आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dudhi Halwa Recipe : नवरात्रीचा प्रसाद होईल स्पेशल, झटपट बनवा दुधीचा चविष्ट हलवा

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा, नुकसानापोटी १२८ कोटी ५५ लक्ष रुपये सरकारकडून मंजूर

Pune Rain: पुण्यात धडकी भरवणारा पाऊस, एका तासात रस्त्यांची झाली नदी; पुणेकरांचे प्रचंड हाल, पाहा VIDEO

WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपवर ऑनलाईन आहात; मित्रांनाही कळणार नाही, करा 'ही' एक सेटिंग

Santosh Juvekar: हिंदी नाटकानंतर संतोष जुवेकर लवकरच झळकणार नव्या चित्रपटात; साकारणार ही महत्वाची भूमिका

SCROLL FOR NEXT