Massive fire erupts after missile strikes hit oil storage facilities near Tehran, escalating tensions in the Middle East Saam Tv
देश विदेश

अमेरिकेकडून इराणचे तेल साठे उद्ध्वस्त, ट्रम्पच्या इशाऱ्यानंतर इराणवर विध्वंसक हल्ला

Us Israel Attack On Iran Oil Depots: ट्रम्प यांच्या इशाऱ्यांनंतर आता इराणवर विध्वंसक हल्ला करण्यात आलाय... अमेरिकेनं इराणचे तेल साठे उद्धवस्त केलेत... मात्र इराणच्या कोणत्या तेल साठ्यांवर हा हल्ला करण्यात आलाय... आणि या हल्ल्याचा जगावर कसा परिणाम होणार आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Omkar Sonawane

अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर 7 मार्चच्या मध्यरात्री इस्रायलनं इराणच्या काळजावर घाला घातलाय..तेहरानमधील तेल डेपोवर भीषण हवाई हल्ला करण्यात आला असून, संपूर्ण इराणमध्ये आगीच्या ज्वाळा पसरलेत...त्यामुळे क्षेपणास्त्र हल्ल्यानं इस्रायलनं इराणला कसा मोठा धक्का दिलाय...पाहूयात...

इस्रायलनं इराणमधील 30 इंधन टाक्या आणि 3 तेल डेपोंवर हल्ला केलाय.. इराणच्या तेल साठ्यांवरील हा पहिला मोठा हल्ला आहे.. तेहरानजवळील हल्ल्यानंतर आकाशात धुराचे लोट उठताना दिसतायत. तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर रस्त्यावरील गटारातही आगीचा भडका उडालाय...

तेल साठ्यांवरील हल्ल्यांमुळे नेमका काय परिणाम होणार? पाहूयात..

तेहरानमधील तेल साठ्यांवरील हल्ल्यामुळे इराणच्या अंतर्गत इंधन पुरवठ्यावर परिणाम होणार

इराणमध्ये पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे..

तेल साठ्यांवरील हल्ल्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती भडकण्याची शक्यता आहे.

किंमती वाढल्यास भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांनाही फटका बसणार...

दुसरीकडे इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सनं इस्रायलविरोधात कसा आक्रमक पवित्रा घेतलाय.इस्रायलच्या हैफामध्ये एका तेल शुद्धीकरण कारखान्यावर इराणने हल्ला केला असून अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध सहा महिने युद्ध लढण्यास सक्षम असल्याचा दावा IRGC चे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांनी केलाय. तर मध्य पूर्वेतील अमेरिका आणि इस्रायली लष्करी तळांवर आणि सुविधांशी संबंधित 200 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केल्याचाही दावा इराणनं केलाय.

खरंतर इस्रायल - अमेरीकेच्या हल्ल्यातून इराणी सरकार तिथल्या लोकाचं संरक्षण करू शकत नाही, हे पटवून देण्यासाठी वारंवार इराणवर हल्ले केले जातायत... त्यातच ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेनंतर तेल साठ्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे आखाती युद्धातील काळरात्र इराणनं चांगलीच अनुभवलीय...आता इराण शेवटचा पर्याय म्हणून अमेरिका-इस्रायलविरोधात अण्वस्त्रांचा वापर करणार का ? की त्यांच्यापुढे शरणागती पत्करणार ? याकडे जगाचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री विजय यांना पहिल्याच दिवशी मोठा धक्का; पाठिंबा देणारा मित्रपक्ष झाला नाराज, नेमकं काय घडलं?

Accident News : लग्नाला निघालेल्या दाम्पत्याचा भीषण अपघात, भरधाव पिकअपची कारला जोरदार धडक

Maharashtra News Live Update: वाढत्या तापमानाचा परिणाम चिमुकल्यांवर होत असल्याने पालकांची चिंता वाढली

Protein Foods: प्रोटीनसाठी चिकन अन् प्रोटीन पावडर कशाला? हे 5 व्हेज पदार्थ आहेत सगळ्यात बेस्ट

Sanju Rathod Success Story: ट्रेनमध्ये बसून एकट्याने गाणी ऐकली, पण आज बनला प्रसिद्ध गायक ; 'गुलाबी साडी' फेम संजू राठोडला आठवला संघर्षाचा तो काळ

SCROLL FOR NEXT