Massive airstrike near Tehran reportedly targets Iran’s top leadership compound during high-level military meeting. Saam Tv
देश विदेश

इराणच्या खामेनींचा 30 सेकंदात खात्मा, अमेरिकेचे 30 ठिकाणी 30 टनांचे बॉम्ब हल्ले|VIDEO

Ayatollah Khamenei Death: इराणचे प्रमुख नेते आणि धर्मगुरु अयातुल्ला खामेनींचा अमेरिकेने अवघ्या 30 सेकंदात खात्मा केलाय... मात्र या हल्ल्यात कोणाकोणाचा मृत्यू झालाय आणि अमेरिकनं इराणवर हा हल्ला कसा केला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Snehil Shivaji

इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात इराणचं अक्षरशः कंबरडं मोडलंय... अमेरिकेनं केवळ तीस सेकंदात इराणचे सर्वोच्च धर्मगुरू अयातोला खामेनींचा हल्ला चढवून त्यांचा खात्मा केलाय. यासाठी अमेरिकेनं तेहरानजवळील ३० ठिकाणांना केवळ ३० सेकंदांत टार्गेट करत जोरदार ३० हल्ले चढवले. विशेष म्हणजे वापरण्यात आलेल्या ३० बॉम्बचे वजनही ३० टन एवढेच होते. त्यामुळे अमेरिकेच्या या तीसच्या आकड्याबाबत गूढ निर्माण झालंय. खामेनी यांची प्रमुख कमांडर्ससोबत महत्त्वाची बैठक सुरू होती. आणि या बैठकीची इस्त्रायलची गुप्तचर संस्था मोसादला माहिती मिळताच त्यांनी डाव साधला आणि खामेनींच्या कंपाऊंडवर जोरदार हल्ला चढवला. यात खोमेनी यांच्यासह त्यांचे कुटुंबदेखील मारलं गेलयं.. खामेनींसह त्यांच्या कुटुंबातलं कोण मारलं गेलंय ते पाहूयात...

30 सेकंदात, खामेनी कुटुंबाचा खात्मा

इस्त्रायल-अमेरिकेच्या हल्ल्यात खोमेनींसह कुटुंबातील सदस्यांचा खात्मा झालाय.. महत्त्वाचे म्हणजे, यात खामेनी यांची मुलगी, नातू, जावई आणि सून देखील हल्ल्यांमध्ये ठार झालेत.

तर दुसरीकडे खामेनींच्या बैठकीत सहभागी असलेल्या इराणचे प्रमुख कमांडर्सचाही या हल्लात मृत्यू झाल्यामुळे इराणला मोठा झटका बसलाय. कोणेत कमांडर यात मारले गेले आहेत ते पाहूयात...

इराणच्या या प्रमुख 7 कमांडर्सचा मृत्यू

- अजीज नसीरजादेह

इराणचे संरक्षण मंत्री

- मोहम्मद पाकपूर

IRGC प्रमुख

- अली शामखानी

खामेनींचे वरिष्ठ सल्लागार

- सलाह असदी

वरिष्ठ लष्करी अधिकारी

- मोहम्मद शिराझी

मिलट्री ब्युरोचे प्रमुख

हसैन जबाल अमेलियन

प्रमुख, संरक्षण संशोधन संस्था

रेझा मोजाफ्फारी निया

माजी अध्यक्ष, संरक्षण संशोधन संस्था

आता इराणच्या सर्वोच्च नेत्याचा मृत्यू झाल्यामुळे इराणमधील जनता रस्त्यावर उतरली आहे. खामेनींच्या मृत्यूमुळे काही ठिकाणी जनतेत आक्रोश आहे तर इराणच्या काही ठिकाणी मात्र जल्लोष साजरा करण्यात येत आहे. खामेनींच्या मृत्यूनंतरही इराणच्या जनतेत सरकारविरोधातला रोष दिसून येत असल्यामुळे सत्तांतर होणार की इराण अमेरिकेला पुरून उरणार याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT