US President Donald Trump and Iran President Masoud Pezeshkian sign a historic ceasefire agreement at the Palace of Versailles, marking a major diplomatic breakthrough. saam tv
देश विदेश

ट्रम्प झुकले, आखातात शांतता, इराण-अमेरिकेत 'व्हर्साय' करार, य़ुद्धबंदीच्या करारात नेमकं काय?

Us Iran Versailles Agreement Ceasefire Details: अमेरिकेची युद्धखोरी आणि इराणची आक्रमकता या दोन्हीला मागे टाकत मुत्सद्देगिरीचा विजय झालाय. फ्रान्समधील G7 शिखर परिषदेदरम्यान इराण-अमेरिकेत महत्त्वपूर्ण करार करण्यात आलाय. य़ुद्धबंदीसाठी करण्यात आलेल्या करारात नेमकं काय आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

इराण-अमेरिका यांच्यात युध्द संपवण्यासाठी अंतरिम करार करण्यात आलाय. त्यामुळे दोन्ही देशांतील युद्धाला पूर्णविराम मिळाला असून आखातात पुन्हा शांतता प्रस्थापित होणार आहे. दरम्यान, फ्रान्समधील ऐतिहासिक व्हर्सायच्या राजप्रासादात इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात 14 कलमी करारावर सह्या झाल्या आहेत. विशेष म्हणजे, यासंदर्भात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी एक व्हिडीओदेखील पोस्ट केलाय. दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यातील ऐतिहासिक करारात नेमके काय आहे? पाहूयात...

दोन्ही देशांमधील करारानुसार, अमेरिका होर्मुझ जलमार्गातील नौदल नाकेबंदी आणि निर्बंध उठवण्यास सुरुवात करणार आहे. तर इराण सुरुवातीच्या 60 दिवसांच्या कालावधीसाठी होर्मुझमधून व्यापारी जहाजांची सुरक्षित ये-जा सुलभ करणार आहे. इतकंच नव्हे तर टप्प्याटप्प्याने निर्बंध उठवणे, इराणची गोठवलेली मालमत्ता मुक्त करणे, इराणच्या तेलाच्या निर्यातीसाठी 'ट्रेझरी वेव्हर्स' म्हणजेच आर्थिक निर्बंधांतून विशेष सवलती देणे आणि इराणसाठी किमान 300 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा पुनर्बांधणी व आर्थिक विकास कार्यक्रम राबवणे, यावर चर्चा करण्यात आलीये. अण्वस्त्रांची निर्मिती करणार नसल्याचं इराणनं या सामंजस्य करारात म्हटलंय. तसंच, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या देखरेखीखाली इराणकडील समृद्ध युरेनियमच्या साठ्याच्या भविष्याबाबत चर्चा करण्याच्या तरतुदींचाही या करारात समावेश आहे.

तर दुसरीकडे, या अंतरिम करारामुळे जागतिक बाजारात स्थिरता येणार असून कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतासह संपूर्ण जगाला महागाईतून दिलासा मिळू शकेल. मात्र, पुढील 60 दिवसांत होणारी अण्वस्त्रांवरील चर्चा या कराराचे भविष्य ठरवणार आहे. त्यामुळे तुर्तास तरी पुढचे 60 दिवस आखातात शांततेचं वातावरण पाहायला मिळण्याची चिन्हे आहेत...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गणपती विसर्जनाच्या बंदोबस्तानंतर ASI अधिकाऱ्याचा मृत्यू; महाराष्ट्र पोलिस दलात शोककळा

Maharashtra News Live Update: शिवाजी पार्कमधील काँग्रेस आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली

Black Raisins Benefits: दिवसाची सुरुवात करा भिजवलेले काळे मनुके खाण्याने, शरिराला मिळतील हे ७ आरोग्यदायी फायदे

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, आज खात्यामध्ये ₹1500 जमा होणार; लगेच मेसेज चेक करा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ₹72 हजार किमान बेसिक पगाराचा प्रस्ताव, फिटमेंट फॅक्टर 4 चर्चेत

SCROLL FOR NEXT