US and Iranian naval forces face off in the Strait of Hormuz amid rising tensions and fears of a wider conflict. saam tv
देश विदेश

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

Fresh Clash in Gulf: इराण-अमेरिका यांच्यात सागरी नाकेबंदीवरून पुन्हा एकदा संघर्ष वाढलाय. अशातच आता अमेरिकेनं नाकेबंदी तोडणाऱ्या इराणच्या जहाजावर हल्ला केलाय. या हल्ल्याला इराणनंही चोख प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे आखाती देश पुन्हा युद्धाच्या आगीत होरपळण्याची भीती व्यक्त केली जातेय..

Omkar Sonawane

आखाती देश पुन्हा युद्धाच्या आगीत होरपळण्याची शक्यताय....कारण अमेरिकेनं आधी होर्मुझची नाकेबंदी आणि आता तर अमेरिकेनं युद्धबंदीचा काळ संपण्याच्या आधीच इराणच्या जहाजावर भीषण हल्ला केलाय.. हे कमी होतं की काय? अमेरिकेनं इराणच्या जहाजावर कमांडोज उतरवून तुस्का जहाज ताब्यात घेतलं आणि इराणचा संतापानं तीळपापड झालाय...

त्याचं झालं असं की, इस्लामाबादमधील अमेरिका आणि इराणमधील चर्चा फिस्कटली.. कारण इराणने होर्मुझवर नियंत्रणाची अट टाकली... त्यानंतर अमेरिकेनं होर्मुझमध्ये डिस्ट्रॉयर पाठवून इराणची नाकेबंदी केली.. याच दरम्यान युद्धबंदी असतानाच चीनकडून इराणच्या दिशेनं निघालेलं तुस्का जहाज ओमानच्या आखातात आलं.. तिथं अमेरिकेची नाकेबंदी होती..अमेरिकन नौदलानं तुस्का जहाजाला थांबण्याचा आदेश दिला.. मात्र हा आदेश धुडकावून तुस्का जहाज पुढेच निघालं होतं... त्यानंतर अमेरिकन नौदलानं थेट तुस्का जहाजाच्या इंजिनवर भीषण हल्ला केला.. आणि हेलिकॉप्टरच्या माध्यमातून कमांडोज उतरवून जहाजावर कब्जा केलाय..

त्यानंतर इरेला पेटलेल्या इराणने अमेरिकेच्या नौदलाच्या जहाजावर विध्वंसक ड्रोन हल्ले चढवलेत... त्यामुळे युद्धबंदीची वेळ संपण्याआधीच युद्ध भडकण्याचं चित्र निर्माण झालंय.. त्यामुळे 14 दिवसांच्या युद्धबंदीमुळे आखाती देशांसोबतच जगानं सुटकेचा निश्वास सोडला होता... मात्र अमेरिकेनं इराणच्या जहाजावर कब्जा केल्यानं आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बेचिराख करण्याचा इशारा दिल्यानं इराण अस्तित्वाची लढाई लढण्यास सज्ज झालाय. त्यामुळे आखाती देशात विध्वंसक युद्धाची शक्यता आहे...हे युद्ध पुन्हा भडकलं तर जगात पुन्हा भीषण तेलसंकट निर्माण होणार, हे मात्र निश्चित...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

राममंदिरातील चोरीचा पैसा शेअर बाजारात? पोलिसांनी 30 बँक खाती गोठवली?

तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

SCROLL FOR NEXT