US-Iran tensions intensify as airstrikes hit Iranian military bases following helicopter downing incident. Saam tv
देश विदेश

इराण-अमेरिकेत पुन्हा युद्ध पेटणार? इराणनं पाडलं अमेरिकेचं हेलिकॉप्टर

Iran Shoots Down US Apache Helicopter Latest News: इराण आणि अमेरिकेचे एकमेकांवर सातत्याने हवाई हल्ले सुरू आहेत. त्यामुळे मध्य-पूर्व आशियात पुन्हा युद्ध भडकणार की काय? अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिकेनं इराणवर का हल्ला केला? इराणनेही शत्रू राष्ट्रांना काय इशारा दिलाय? पाहुयात एक रिपोर्ट

Saam Tv

इराण-इस्त्रायल यांच्यात संघर्ष सुरू असताना आता अमेरिकेनंही इराणवर भीषण हल्ला केलाय. त्यामुळे आखातातील तणाव पुन्हा एकदा टोकाला गेलाय. होर्मुझ जलमार्गाजवळ इराणनं केलेल्या हवाई हल्ल्यात अमेरिकेचं अत्याधुनिक अपाचे लढाऊ हेलिकॉप्टर पाडण्यात आलं होतं. या हल्ल्यानंतर चवताळलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांतच इराणवर कारवाई करण्याचे आदेश दिले. ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकन सैन्यानं इराणच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले सुरू केले आहेत...

अमेरिकेकडून इराणच्या होर्मोझगान प्रांत, केशम बेट, बंदर अब्बास, सीरिक, जास्क येथील रडार तळांना लक्ष्य करण्यात येतंय.

दरम्यान, अमेरिकेच्या या हल्ल्यांमुळे संतापलेल्या इराणनंही चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिल्यानं मध्य-पूर्वेत तणावाची परिस्थिती निर्माण झालीये. अमेरिकेनं जर आमच्यावर लष्करी कारवाई करण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर देण्याचा इशारा इराणनं दिलाय. इतकंच नव्हे तर इराकच्या हवाई हद्दीत इराणचे आत्मघाती ड्रोन दिसल्याची माहितीही समोर आलीये. त्यामुळे पुन्हा आखाती युद्ध भडकण्याची चिन्ह आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli Photos: निक्की तांबोळीचा कातील अंदाज; फोटो पाहून नजर हटणार नाही

पुण्यातील कॉलेजबाहेर गांजाविक्री? मनसैनिकांना घेऊन अमित ठाकरेंनी टाकली दुकानावर धाड|VIDEO

Land vs Flat Investment : जमीन की फ्लॅट? तुमचा पैसा कुठे गुंतवला तर होईल जास्त फायदा? खरेदीपूर्वी जाणून घ्या हा फरक

Maharashtra News Live Update: हिंगोलीतून ओबीसी बांधव रवाना

शासकीय कार्यालयात मंत्र्यांचा, पंतप्रधानांचा फोटो लावता येतो का? काय आहेत नियम?

SCROLL FOR NEXT