US President Donald Trump announces 100% tariff on India over Russian oil imports, raising concerns over trade tensions and global economic impact. saam tv
देश विदेश

अमेरिकेचं भारतावर 100 टक्के टॅरीफ, रशियन तेल खरेदीमुळे ट्रम्प भडकले

Trump Targets India With 100% Tariff Amid Russia Oil Row: अमेरिकेनं भारतावर 100 टक्के टॅरिफ लादलंय... ट्रम्प यांनी भारतावर पुन्हा अचानक टॅरिफ का लावलं ? अमेरीकेच्या या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होणार? पाहूयात या रिपोर्टमधून...

Girish Nikam

अमेरिकन सिनेटने भारतासह 5 देशांवर रशियन तेल खरेदीमुळे 100% टॅरिफ लावण्याचं विधेयक मंजूर केलं आहे... 86-विरूद्द 11 च्या बहुमतांनी हे विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. युरोपीय देशांना मात्र यातून सूट दिली आहे. हे विशेष...भारतानं जूनमध्ये 52.4% तेल रशियाकडून खरेदी केलं. मात्र रशियाच्या पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीतून होणारे उत्पन्न कमी करणे आणि युक्रेनमधील युद्ध थांबवण्यासाठी मॉस्कोवर दबाव वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. मात्र याचा भारताला फटका बसण्याची शक्यता आहे. भारतातून निर्यात झालेल्या वस्तूची किंमत 1000 रुपये असल्यास ती वस्तू 100 % टॅरिफमुळे अमेरिकेत 2000 रुपयांना मिळणार. याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतात ते पाहुयात...

भारतावर होणारे संभाव्य परिणाम

अमेरिकन बाजारात भारतीय निर्यात महागणार

भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर भडकणार

भारत-अमेरिका संबंधांमध्ये तणाव वाढू शकतो

भारताच्या ऊर्जा स्वातंत्र्यावर मोठा दबाव येण्याची शक्यता

युरोपीय देशांना सूट देऊन भारतासोबत दुजाभाव

सध्या चीन, भारत, अजरबैजान, हंगेरी आणि स्लोव्हाकिया हे रशियाचे टॉप-5 तेल खरेदीदार आहेत. अमेरीका कराचा शस्त्राप्रमाणे वापर करुन भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचं संरक्षण तज्ञांचं म्हणणं आहे. सिनेटमध्ये मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक आता अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात जाईल. या विधेयकात रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि वरिष्ठ लष्करी कमांडर्सवर नवीन निर्बंध तसेच व्हिसा बंदी लागू करण्याची तरतूद आहे. दुसरीकडे इराणच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवरही दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. भारत या दबावाला कसे सामोरे जाणार ? जुना विश्वासू मित्र रशियाला न दुखावता अमेरीकेविरोधात काय रणनिती आखणार ? हे पाहणं महत्वाचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baba Vanga : ५०७९ मध्ये खरंच जग संपणार? बाबा वेंगांच्या या भविष्यवाणीने उडवली खळबळ

अमित ठाकरेंसह २५ जणांवर पुण्यात गुन्हा; प्राचार्यांच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई, आरोप काय?

Nikki Tamboli Photos: निक्की तांबोळीचा कातील अंदाज; फोटो पाहून नजर हटणार नाही

पुण्यातील कॉलेजबाहेर गांजाविक्री? मनसैनिकांना घेऊन अमित ठाकरेंनी टाकली दुकानावर धाड|VIDEO

Land vs Flat Investment : जमीन की फ्लॅट? तुमचा पैसा कुठे गुंतवला तर होईल जास्त फायदा? खरेदीपूर्वी जाणून घ्या हा फरक

SCROLL FOR NEXT