जगातील सर्वात मोठी महासत्ता असलेल्या अमेरिकेत आज रात्री 12 वाजल्यानंतर शटडाऊन होणार आहे. यामुळे आपत्कालीन सेवांव्यतिरिक्त सर्व सरकारी कामे ठप्प होणार आहेत. अमेरिकन सरकार आणि त्यांच्या सर्व यंत्रणा काम करणे थांबवणार आहे.
गेल्या चाळीस वर्षात चौथ्यांदा अमेरिकेत शटडाऊन होत आहे. त्याचा परिणाम अमेरिकेवरच नाही तर संपूर्ण जगावर होणार आहे. अमेरिकन सरकारी शटडाऊनचा गुंतवणूकदारांवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
आर्थिक दृष्टिकोनातून समजून घेतल्यास या शटडाऊनचा परिणाम अमेरिकेसह जगभरातील गुंतवणूकदारांवर होणार असून त्यामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळू शकतात. मात्र अमेरिका शटडाऊन का करत आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. याचबद्दल आपण पुढे जाणून घेऊ... (Latest Marathi News)
यूएस शटडाउन म्हणजे काय?
अमेरिकेत जेव्हा-जेव्हा सरकारच्या निधीबाबत सरकार आणि विरोधकांमध्ये गदारोळ होतो, तेव्हा तिथे शटडाऊनची परिस्थिती निर्माण होते. शटडाऊन होताच सुमारे 40 लाख सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले जातात.
नासासारख्या संस्थांच्या संशोधनावरही याचा परिणाम होतो. राष्ट्रीय उद्याने बंद होतात. आपत्कालीन सेवा वगळता शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सर्व गोष्टी बंद होतात. मात्र त्याचा खासगी क्षेत्रावर फारसा परिणाम होत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.