देश विदेश

US Election 2024: कधी होणार मतदान, कधी येतील निकाल? जाणून घ्या निवडणूकीसंदर्भातील प्रश्नांची उत्तरे

US President Election: अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी मतदान होत आहे. आता काही तासानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्या भविष्याचा निकाल लागणार आहे. दरम्यान निवडणुकीसंदर्भात काही प्रश्न असतील त्यांची उत्तरे जाणून घेऊ.

Bharat Jadhav

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी मतदान सुरू झालंय. अमेरिकेतील दोन सर्वात मोठे राजकीय पक्ष रिपब्लिकन पार्टी आणि डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिसमध्ये मोठी चुरशीची लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये तगडी संघर्ष होत असल्याने काय निकाल लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. दरम्यान राष्ट्राध्यक्षांची निवड कशी होते?

भारतीय राष्ट्रपतींची निवड होते त्याचप्रमाणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड होते का? असे प्रश्न अनेकांना पडली आहेत. मतदान प्रक्रिया कधी पार पडणार, कधी निकाल लागणार या प्रश्नांची उत्तरे तुम्ही शोधत असाल तर हा लेख महत्त्वपूर्ण आहे.

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मतदान कधी होणार

अमेरिका अध्यक्षांची निवडणुकीसाठी होणारे मतदान हे वेगवेगळ्या राज्यातील स्थानिक वेळेनुसार सुरू होईल. सकाळी ७ वाजेपासून ते ९ वाजेदरम्यान मतदान प्रक्रिया पार पडेल. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी साडेचार वाजेपासून ते साडेनऊ वाजेपर्यंत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान अमेरिकेत मतदान संपेपर्यंत भारतात दुसरा दिवस सुरू होईल. भारतीय वेळेनुसार अमेरिकेतील मतदान बुधवारी पहाटे साडेचार वाजेपर्यंत संपू शकते. अनेक राज्यांमध्ये ही वेळ अधिक असू शकते कारण अमेरिकेची राज्ये अनेक वेगवेगळ्या टाइम झोनमध्ये विभागली गेली आहेत.

अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीसाठी होणार मतदान संपताच मतांची मोजणी सुरू होईल. मत मोजणी संपताच विजेता उमेदवार कोण याची घोषणा केली जाईल. परंतु प्रत्येक वेळी सर्वाधिक लोकप्रिय मते मिळवणारा उमेदवारच अध्यक्षपदाचा विजेता असतोच असे नाही. कारण अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाची निवड लोकांच्या मतांनी नव्हे तर इलेक्टोरल कॉलेजद्वारे केली जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT