IMF loan saam tv
देश विदेश

India Pakistan Tension: दुतोंडी अमेरिका, पाकच्या मदतीला? भारताचा विरोध डावलून पाकला मदत भीकेच्या पैशावर पाकची युद्धखोरी

Sindoor operation: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढला. त्यातच एकीकडे भारताच्या कुरापती काढणाऱ्या आणि दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानला अमेरिका धार्जिण्या आयएमएफनं 1 अब्ज डॉलरचं कर्ज दिलंय आणि आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न केलाय.. तो नेमका कसा? पाहूयात...

Saam Tv

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर भारतानं पाकिस्तानची आयात बंद केली.. एवढंच नाही तर सिंधू जलकरार रद्द करुन पाकला दणका दिला.. त्यानंतर पाकनं युद्धसरावातच 50 अब्ज रुपये खर्च केला.. त्यामुळे पाक आणखीच दुबळा बनलाय.. त्यामुळे युद्ध भडकल्यास आर्थिक तंगी निर्माण होऊ शकते, त्यामुळे पाकनं आयएमएफकडे धाव घेत 7 अब्ज डॉलरची मागणी केली.. त्याला भारतानं जोरदार विरोध दर्शवला.. मात्र त्यानंतरही आयएमएफनं पाकला 1 अब्ज डॉलरचं कर्ज दिलंय...मात्र पाकला भीकेचा कटोरा घेऊन आयएमएफच्या दारी का जावं लागलंय? पाहूयात...

खरंतर पाकिस्ताननं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत 24 वेळा आयएमएफकडून कर्ज घेतलंय... मात्र कर्ज फेडणं शक्यच नसल्यानं पाकनं तब्बल 23 वेळा कर्जमाफी करुन घेतलीय...मात्र आता पाकला मिळालेल्या कर्जामुळे भारतावर काय परिणाम होईल? याची माहिती तज्ज्ञांनी दिलीय.

खरंतर भारतासारख्या शांतताप्रिय देशाविरोधात कुरापत करणाऱ्या पाकिस्तानला ग्रे यादीत टाकून कठोर आर्थिक निर्बंध लादण्याची गरज असताना आयएमएफनं पाकला मदत केलीय.. त्यामुळं पाकिस्तान दात कोरुन पोट भरत नसतं आणि कर्ज काढून युद्ध जिंकणं शक्य नसतं, हे पाकनं लक्षात ठेवायला हवं....

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT