Satellite view of Iran’s strategic Kharg Island oil terminal after the reported US airstrike, raising concerns over global oil supply disruption Saam Tv
देश विदेश

अमेरिकेचा इराणच्या खर्ग बेटावर बॉम्बहल्ला, आखाती युद्धात चीन घेणार उडी?

Kharg Island Attack: इराण-इस्रायल युद्धात आता चीन उडी घेणार आहे...इराणच्या खर्ग बेटावरील हल्ल्यातून अमेरिकेनं चीनचीही कोंडी केलीय. खर्ग बेट इराणसाठी किती महत्त्वाचं आहे? त्याचा चीनचा कसा संबंध आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

अमेरिकेनं इराणच्या खर्ग बेटावर केलेल्य़ा भीषण बॉम्बहल्ल्यामुळे अमेरिका- इराण युद्ध आता निर्णायक वळणावर पोहचलयं... लवकरच तिसरं महायुद्ध सुरु होण्याची भिती व्यक्त होतेय... खरंतर अमेरिकेनं केलेला हा हल्ला फक्त एका बेटापुरता मर्यादित नाही तर जगातील सर्वात मोठ्या तेल बाजारपेठेवर आणि अप्रत्यक्षपणे चीनवरील मोठा प्रहार आहे... त्यामुळे अमेरिकेविरोधात आता चीन युद्धात उडी घेणार का? असा सवाल निर्माण झालाय...

आखाती युद्धात चीन घेणार उडी?

खर्ग बेट इराणच्या तेल निर्यातीचे प्रमुख केंद्र आहे. तेल निर्यातीपैकी तब्बल 90% वाटा हा एकट्या खर्ग बेटाचा आहे.या बेटावरून सर्वात जास्त तेल निर्यात चीनला केली जाते..युद्धामुळे चीननं रिफाइंड इंधन निर्यातीवर बंदी घालून आपला पुरवठा सुरक्षित करण्याचा प्रयत्न केलाय... मात्र अमेरिकेच्या हल्ल्यामुळे खर्ग बेट निर्यातीसाठी पूर्णपणे बंद होण्याची शक्यता आहे...खर्गमधील पुरवठा विस्कळीत झाल्यास 2 दशलक्ष बॅरल तेल वाया जाऊ शकते...त्यामुळे अमेरिकेचा खर्गवरील हल्ला चीनसाठी इशारा आहे. चीनला तेलासाठी महागडे पर्याय शोधावे लागतील...

इराणविरुद्ध युद्धाच्या सुरुवातीला अमेरीकेने खर्गवर हल्ला टाळला होता. कारण खर्गवरील हल्ल्यामुळे जागतिक ऊर्जा बाजारपेठ विस्कळीत होण्याचा धोका ट्रम्प यांना सतावत होता...मात्र आता ट्रम्प यांनी खर्गवर केलेल्या हल्ल्यामुळे चीनची ऊर्जा सुरक्षा धोक्यात आलीय.. अशावेळी चीन थेट य़ुद्धात सहभागी होईल, अन्यथा इराणला पाठिंबा देऊन अमेरिकेविरोधात नवी रणनीती आखेल..या हल्ल्यामुळे काय धोके निर्माण झालेत पाहूयात..

खर्गवरील हल्ल्यामुळे जगावर तेल संकट अधिक गंभीर होणार आहे.

इराण-इस्रायल युद्धात चीन उडी घेण्याची शक्यता

जागतिक ऊर्जा बाजारपेठ विस्कळीत होईल

तेलाच्या किंमती गगनाला भिडतील

जागतिक बाजारपेठेत महागाईचा भडका उडेल

दरम्यान खर्ग बेटावरील हल्ल्यानंतर इराणनं

तेल ऑपरेशन्स पुन्हा सुरू झाल्याचा दावा केलाय...तसचं यापुढे अमेरिकेनं इराणच्या तेल सुविधांवर हल्ला केल्यास आखातात युद्धाचा भडका उडेल, असा इशाराही इराणनं दिलाय...तर दुसरीकडे इराणनं होर्मुझ जलमार्गातील सुरुंग काढले नाही तर खर्ग बेट उद्धवस्त करू, असा इशारा अमेरिकेनं दिलाय... त्यामुळे आता चीन इराणला पाठिंबा देऊन अमेरिकेची कोंडी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : विठ्ठलवाडी ते कल्याण ५० मिनिटांचा थरार; एसी लोकलच्या टपावर चढला तरूण, रेल्वे स्थानकात उडाला गोंधळ

Symptoms Of Dehydration: या ५ लक्षणांवरुन ओळखा शरीराला आहे पाण्याची गरज

Maharashtra News Live Update: पीक विम्याचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांचं धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Summer Hairstyles: मानेवरचा घाम आणि केसांचा गुंता टाळण्यासाठी उन्हाळ्यात करा या 5 युनिक हेअरस्टाईल्स

Pune Police: २ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ

SCROLL FOR NEXT