UPSC Recruitment 2023 Saam Tv
देश विदेश

UPSC 2023 Final Result: यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर; लखनऊचा आदित्य ठरला टॉपर

UPSC 2023 Final Result : देशभरातील अनेक उमेदवार केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या २०२३च्या परीक्षेच्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. आता या उमेदवारांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : देशभरातील अनेक उमेदवार केंद्रीय लोक सेवा आयोगाच्या २०२३च्या परीक्षेच्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. आता या उमेदवारांची प्रतिक्षा संपुष्टात आली आहे. केंद्रीय लोक सेवा आयोगाने यूपीएससी सीएसई परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर केला.

यूपीएससी सीएसई परीक्षेत आदित्य श्रीवास्तव टॉपर ठरला आहे. तर दुसरा क्रमांक अनिमेष प्रधानने पटकावला आहे. तर तिसरा क्रमांक अनन्या रेड्डीने पटकावला आहे. तसेच चौथा क्रमांक पीके सिद्धार्थ रामकुमारने पटकावला आहे. तर पाचवा क्रमांक रुहानीने पटकावला. ही परीक्षा ११४३ जागांसाठी झाली होती. यातील १०१६ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती.

या परीक्षेत सर्वसाधारण वर्गातून ३४७, ईडब्ल्यूएस वर्गातून ११५, ओबीसी वर्ग ३०३, एससी वर्ग १६५, एसटी वर्ग ८६ इतके उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण १०१६ उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले. तसेच ३५५ जणांना प्रोविजनल लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे.

यूपीएससीची पूर्व परीक्षा ही मागच्या वर्षी २८ मे रोजी आयोजित केली होती. जे उमेदवार पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झाले, ते उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले होते. यूपीएससी सीएसई मुख्य परीक्षेचा निकाल ८ डिसेंबर रोजी घोषित झाला होता.

निकाल कसा पाहाल?

१. सुरुवातीला अधिकृत वेबसाईट -upsc.gov.in यावर जावे.

२. वेबसाईटच्या होमपेजवर गेल्यावर निकालाच्या लिंकवर क्लिक करावी.

३. पुढे पुन्हा निकालावर क्लिक करावे.

४. त्यानंतर एक पीडीएफ फाईल ओपन होईल.

५. पीडीएफमध्ये तुमचा क्रमांक शोधा .

६. पीडीएफ डाऊनलोड करून प्रिंट आऊट काढा. भविष्यात उपयोगी येऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhendi Bhaji Recipe: हिरवी मिरची टाकून भेंडीची भाजी कशी बनवायची?

New Year Trip 2026 : नवीन वर्षात 'ही' 8 ठिकाणं नक्की फिरा, गर्दी-गोंधळापासून दूर शांतता अनुभवाल

20-25 हजारांमध्ये मुली मिळतात; भाजप मंत्र्यांच्या पतीने अकलेचे तारे तोडले, VIDEO

एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा भीमाशंकर मंदिरात राडा, पुजाऱ्याला लाथा बुक्यांनी मारहाण|VIDEO

Sunday Megablock : मध्य रेल्वेचा रविवारी कडकडीत मेगाब्लॉक! ट्रान्स हार्बरवर हालहाल होणार, कुठून कुठे अन् कसं असेल वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT