UPI payments Saam Tv
देश विदेश

UPI चे सर्व्हर डाऊन ! ग्राहकांना बसला मोठा फटका

PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या प्रमुख UPI अॅप्सद्वारे व्यवहारांवर प्रक्रिया डाऊन झाली आहे.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली: इंटरनेट बॅंकिंगमध्ये सर्वात महत्वाचं घटक असलेल्या युपीआय पेमेंटसच्या व्यवहारात तांत्रिक बिघाडामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा सर्वात मोठा फटका युपीआय ग्राहकांंना बसला आहे.

रविवारी रात्री अचानक ८ वाजल्यापासून युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) सर्व्हर बंद आहेत. त्यामुळे अनेकांचे पेमेंट होतं नाही. यामुळे ग्राहकांनी नाराज व्यक्त केली आहे. PhonePe, Google Pay आणि Paytm सारख्या प्रमुख UPI अॅप्सद्वारे व्यवहारांवर प्रक्रिया डाऊन झाली आहे. याबद्दल अनेक वापरकर्त्यांनी ट्विटरवर तक्रारी केल्या आहेत.

हे देखील पाहा

युपीआय (UPI) सर्व्हर डाउन होण्याची ही वर्षातील दुसरी वेळ आहे, ९ जानेवारी रोजी असेच सर्वर डाऊन झाले होते. NPCI ने अजुनही यावर कोणतीच प्रतिक्रीया दिलेली नाही.

युपीआय (UPI) नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ची रिअल-टाइम पेमेंट सिस्टम, भारतातील व्यवहारांपैकी ६० टक्के आहे. फक्त मार्च महिन्यातच युपीआय ( UPI) ने ९.६० लाख कोटी रुपयांचे ५४० कोटी व्यवहार केले आहेत.

दरम्यान NPCI बँक आणि इन-हाउस सर्व्हरवरील भार कमी करण्यासाठी ऑफलाइन मोडमध्ये पेमेंट सक्षम करण्यावर काम करत आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: वारंवार फेस क्लिनअप करायची सवय आहे? एकदा जाणून घ्या क्लिनअपचे फायदे आणि नुकसान

Anant Chaturdashi 2025 live updates : उत्तराखंड मधील ‘शिव महिमा’ नृत्य कलाकार ठरले...गणेश मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

SCROLL FOR NEXT