up station in charge caught flirting with a woman inspector in agra सोशल मीडिया
देश विदेश

पोलिसाचं स्टेशनमधील महिलेसोबतचं लफडं! रंगेहात पकडलं अन् कुटुंबियांनी धू धू धुतला, Video व्हायरल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आग्रा : पोलीस स्टेशनमधीलच सहकारी पोलिसासोबत (Police) अफेअर करणं एका महिला पोलिस अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडलेय. आग्रा जवळील रकाबगंज येथील महिला पोलिस अधिकाऱ्याचं स्टेशनमधीलच एका पोलिस कर्मचाऱ्यासोबत अफेअर होते. या दोघांना कुटुंबियांनी रंगेहात पकडलं. त्यानंतर त्या पोलिसाला कुटुंबियाने धू धू धुतले. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

महिला पोलिस स्टेशन प्रभारी आणि प्रियकर इन्स्पेक्टरसोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर (social media) व्हायरल होत आहे. इंस्पेक्टरचे कुटुंबीय अचानक महिला पोलिस स्टेशनच्या प्रभारींच्या घरी पोहोचतात. त्यानंतर दोघांनाही घराबाहेर काढतात. यावेळी इन्स्पेक्टरचे कुटुंबीयही त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. या प्रकराचा व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

पाहा व्हिडीओ

रकाबगंज पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस अधिकाऱ्याचं त्याच पोलीस ठाण्याच्या इन्स्पेक्टरसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. तिथे दोघेही एकमेकांना भेटू लागले. दरम्यान, शनिवारी सायंकाळी इन्स्पेक्टरच्या कुटुंबीयांनी अचानक महिला पोलीस ठाणे प्रभारी यांच्या घरी पोहोचून एकच गोंधळ घातला.

दोघांनाही कुटुंबियांनी धू धू धुतले -

दोन महिलांनी महिला पोलीस स्टेशन इनचार्चला पकडून मारहाण केली. त्याचवेळी तीन-चार मुलांनीही त्या पुरुष पोलीस स्टेशन प्रभारीला पकडून चोप दिल्याचं व्हिडीओत दिसत आहे. इन्स्पेक्टर बनियान आणि जीन्समध्ये दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्पेक्टर आणि त्यांच्या पत्नीमध्ये घटस्फोटाचा खटला सुरू आहे. तर व्हिडिओमध्ये एक व्यक्ती असे म्हणताना दिसत आहे की, लग्नापासूनच अफेअरचा संशय होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT