UP Lok Sabha Election 2024 Exit Poll:  
देश विदेश

UP Lok Sabha Election 2024 Exit Poll: यूपीचा एक्झिट पोल, एनडीएला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज

Election 2024 Exit Poll : यूपीचा एक्झिट पोल सुरू झाला असून प्रथम आलेल्या एजन्सीच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला ८० पैकी ६२ जागा मिळत आहेत. तर इंडिया आघाडीला १८ जागा मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

Bharat Jadhav

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा अखेरचा ७ वा टप्पा पार पडल्यानंतर संध्याकाळी एक्झिट पोल जाहीर झालेत. देशातील सर्वात मोठ्या राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमधील एक्झिट पोल समोर आले असून यात एनडीएला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्कूल ऑफ पॉलिटिक्सने प्रथम उत्तर प्रदेशचा एक्झिट पोल दिला असून यामध्ये एनडीएला ६२ तर सपा-काँग्रेस आघाडीला १८ जागा मिळताना दिसताहेत.

दरम्यान एक्झिट पोलपूर्वी दिल्लीत इंडिया अलायन्सची बैठक झालीय. बैठकीनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आम्हाला २९५ जागा मिळत असल्याचा दावा केलाय. त्यांनी निवडणूक आयोगाकडे भेटीची वेळही मागितलीय. दरम्यान टीव्ही चॅनल्सनी यूपीच्या सर्व ८० जागांसाठी एक्झिट पोल तयार केलाय. या एक्झिट पोलपूर्वी विविध निवडणूक विश्लेषकांनी, त्यांच्या गणनेनुसार, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि सपा-काँग्रेस इंडिया युतीसाठी जागांचा अंदाज वर्तवलाय. प्रशांत किशोर यांनी एनडीएला ३०३ पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता वर्तवलीय.

गेल्या वेळी यूपीच्या एक्झिट पोलमध्ये बहुतांश अंदाज बरोबर नव्हते. फक्त आजतक-ॲक्सिसच्या एक्झिट पोलने भाजपला ६२-६८ जागा, काँग्रेसला एक ते दोन जागा आणि सपा-बसपा युतीला १०-१६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. जे बरोबर निघाले. एबीपी-निल्सन एक्झिट पोलमध्ये सपा-बसपा युतीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यांनी भाजपला २२ जागा, काँग्रेसला २ जागा आणि सपा-बसपा युतीला ५६ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला. टाईम्स नाऊ-व्हीएमआर एक्झिट पोलने भाजपला ५८ जागा आणि सपा-बसपाला २० जागा दिल्या आहेत. इंडिया टीव्ही-सीएनएक्स एक्झिट पोलने भाजपला ५० जागा, सपा-बसपाला २८ जागा आणि काँग्रेसला दोन जागा दिल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik News: कार नदीत कोसळली; पण मोबाईलनं वाचला दोन मित्रांचा जीव

Muslim reservation : मोठी बातमी! मुस्लिम समाजाचे आरक्षण रद्द, फडणवीस सरकारचा निर्णय

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT