Yogi Adityanath  SaamTvNews
देश विदेश

UP Election Results 2022: यूपीतही भाजपला बहुमत, योगी आदित्यनाथ 1 लाख 2 हजार मतांनी विजयी

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.

वृत्तसंस्था

UP Election Results 2022: उत्तर प्रदेशच्या जनतेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला कौल दिला आहे. देशातील सर्वाधिक मतदारसंघ असलेल्या राज्यात भाजपने 403 पैकी 270 जागा जिंकत बहुमत मिळवलं आहे. तर, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गोरखपूर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा 1 लाख 2 हजार मतांनी विजय झाला आहे. ते गोरखपूरमधून निवडणूक लढवत होते. "हिंदू-मुस्लिम-शीख-इसाई सबके सब हैं भाजपायी." तुष्टीकरणाचे राजकारण, जातीच्या आधारावर राज्याचे विभाजन करणाऱ्या सर्वांना हे उत्तर आहे. 10 मार्च रोजी आम्ही 'जय श्री राम' घोषणेसह सरकार स्थापन करत आहोत...; यापेक्षा चांगले सरकार मिळू शकत नाही, असे यावेळी अपर्णा यादव म्हणाल्या आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) हे सायंकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यानंतर ते दिल्लीला जातील, जिथे ते संसदीय मंडळाच्या बैठकीत सहभागी होतील.

योगी आदित्यनाथ चार रेकॉर्ड मोडणार

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांचा मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा राज्याभिषेक होणार आहे. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची ही दुसरी टर्म असेल आणि शपथ घेताच ते यूपीच्या राजकारणाशी संबंधित 4 रेकॉर्ड मोडतील.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT