UP: भाजपाची पहिली यादी जाहीर; योगी आदित्यनाथ यांचा मतदार संघ ठरला
UP: भाजपाची पहिली यादी जाहीर; योगी आदित्यनाथ यांचा मतदार संघ ठरला Saam Tv News
देश विदेश

UP: भाजपाची पहिली यादी जाहीर; योगी आदित्यनाथ यांचा मतदार संघ ठरला

वृत्तसंस्था

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. पक्षाने आज जाहीर केलेल्या यादीत राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या नावांचाही समावेश आहे. पक्षाने मुख्यमंत्री योगी (Yogi Adityanath) यांना गोरखपूरमधून उमेदवारी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना सिरथू मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. मात्र, यापूर्वी अशी चर्चा होती की पक्ष सीएम योगी यांना अयोध्येतून मैदानात उतरवू शकतो. दुसरीकडे, आज पहिल्या टप्प्यात भाजपने (BJP) 57 जागांसाठी उमेदवार जाहीर केले.

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आज पहिली यादी जाहीर केली आहे. आज या यादीत उमेदवारांना तिकिटं देण्यात आली आहेत. ज्यामध्ये सर्वात मोठे नाव आहे ते राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे. ते पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे, आज दिल्लीत राज्य निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान आणि पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी निवडणुकीची पहिली यादी जाहीर केली.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Onion Benefits: शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी बहुगुणी ठरेल कांदा

Indore Lok Sabha Constituency : इंदूरमध्ये 'सूरत'ची पुनरावृत्ती, काँग्रेसला मोठा झटका; उमेदवाराने अर्ज मागे घेतला

Bike Care Tips: उन्हाळ्यात बाईकची काळजी कशी घ्याल? या भन्नाट ट्रिक्स फॉलो करा

Weightloss Tips: मासिक पाळीनंतर खा हे पदार्थ , वजन होईल कमी

Shubman Gill Statement: गुजरातचं नेमकं चुकतय तरी कुठं? कर्णधार शुभमन गिलने सांगितली पराभवाची कारणं

SCROLL FOR NEXT