Uddhav Thackeray Saam Tv
देश विदेश

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा; केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे.

Pramod Subhash Jagtap

नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुकांचे सर्व राजकीय पक्षाला वेध लागले आहेत. सर्व राजकीय पक्षांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी केली आहे. शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. याचदरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला पक्षनिधी स्वीकारण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला निधी स्वीकारता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षनिधी स्वीकारण्यास मंजुरी दिली आहे. शरद पवार यांच्या मागणीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती.

शिवसेना फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदे गटाला दिलं होतं. तर ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह स्वीकारावं लागलं. तसेच त्यांना पक्षाचं नावही बदलावं लागलं. शिवसेना फुटीनंतर पक्षनिधीचा प्रश्न केंद्रीय निवडणूक आयोग आणि कोर्टात पोहोचला होता.

यामुळे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला निधी स्वीकारण्यास परवानगी नव्हती. यानंतर पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी मागितली होती. त्यानंतर आज गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला पक्षनिधी स्वीकारण्याची परवानगी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

'मी शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलाय!; ओमराजे निंबाळकरांनी सांगितली ठाकरे गट सोडण्याची कारणं

NEET Student: 'मला माफ करा...' नीटच्या आणखी एका विद्यार्थिनीची आत्महत्या, मृतदेह पाहून कुटुंबीय हादरले

Chhatrapati Sambhajinagar : पावसाळ्यातील स्वर्ग! 200 फूट उंचीवरून कोसळणारा संभाजीनगरचा धबधबा पर्यटकांना घालतो भुरळ

महिला शेतकऱ्यांना कायदेशीर दर्जा मिळणार,अधिवेशनात 10 विधेयके मांडणार: मुख्यमंत्री

SCROLL FOR NEXT