Union Budget 2023 Saam Tv
देश विदेश

Union Budget 2023 : नर्सिंग कॉलेज संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महत्त्वाची घोषणा

लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे.

Shivani Tichkule

Union Budget 2023 Live News : आज सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत मोदी 2.0 सरकारचा 5वा अर्थसंकल्प सादर करत केला. लोकसभा निवडणुकीपूर्वीचा मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला.

यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. दरम्यान, नर्सिंग कॉलेज संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची महत्त्वाची घोषणा केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (nirmala sitharaman) यांनी सांगितले की, 2014 नंतर स्थापन झालेल्या विद्यमान 157 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांच्या सहकार्याने 157 नवीन नर्सिंग महाविद्यालये स्थापन केली जाणार आहे. मोदी सरकारचा दुसरा टर्म हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीचा हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

पुढील वर्षभर मिळणार मोफत अन्नधान्य

यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गरिबांसाठी महत्वाची घोषणा केली. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत केंद्र सरकार २ लाख कोटी रुपये खर्च करत आहे, अशी माहिती देतानाच, अंत्योदय योजनेंतर्गत गरिबांना मोफत धान्य पुरवठा एका वर्षासाठी वाढवण्यात आला आहे, अशी घोषणा त्यांनी केली.

दरडोई उत्पन्न दुपटीने वाढून १.९७ लाख रुपये झाले आहे. या ९ वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून विकसित झाली आहे, हे देखील त्यांनी नमूद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: लिफ्टमध्ये अडकली होती २ मुलं, धाडस दाखवत मुलीने वाचवले प्राण, व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी मोठी अपडेट

Upit Recipe: संध्याकाळी भूक लागल्यावर झटपट बनवा टेस्टी आणि हेल्दी उपीट, वाचा सोपी रेसिपी

How to Keep Kobi Fresh: कोबी आठवडाभर राहील ताजी, वापरा फक्त ही १ ट्रीक

Chennai Beach Accident : चेन्नईच्या बीचवर महाराष्ट्रातील ३ जण वाहून गेले, एका मुलीचा मृत्यू, एकजण बेपत्ता, सुदैवानं एक बचावला

SCROLL FOR NEXT