Union Budget 2022 Saam Tv
देश विदेश

Union Budget 2022: छत्र्या महागणार, मोबाईल चार्जर, पॉलिश हिरे स्वस्त होणार, पाहा काय स्वस्त, काय महाग?

या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

साम वृत्तसंथा

Union Budget 2022: नवी दिल्ली: देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा चौथा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात कोणाला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. काय स्वस्त होणार आणि काय आणखी महागणार याची संपूर्ण यादी आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत (Union Budget 2022 know what become cheaper and what become expensive).

काय स्वस्त होणार काय महागणार?

◼️अर्थसंकल्पानंतर (Budget 2022) कृषी माल स्वस्त होणार आहे.

◼️कट आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांवर कस्टम ड्युटी कमी करण्यात आली आहे. म्हणजेच तेही स्वस्त होणार आहेत होतील.

◼️मोबाईल फोन चार्जरच्या ट्रान्सफॉर्मर आणि कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क कमी करण्यात आले आहे. घरगुती मोबाईल फोन चार्जर स्वस्त होणार आहेत.

◼️देशात असेंबल केलेले मोबाईलही स्वस्त होऊ शकतात. देशांतर्गत स्तरावर मोबाईल (Mobile) उत्पादनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

◼️परदेशातून येणारी यंत्रसामग्रीही स्वस्त होणार आहे.

◼️कापड आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार.

◼️काही रसायनांवरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा प्रस्ताव आहे, यामध्ये मिथेनॉलचाही समावेश आहे.

◼️स्टील भंगारावरील कस्टम ड्युटीमध्ये सूट आणखी एक वर्ष वाढवण्यात येत असल्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली आहे.

◼️इलेक्ट्रॉनिक वस्तूही स्वस्त होणार आहेत.

◼️त्याचबरोबर छत्र्यांची खरेदी महाग होणार आहे. छत्र्यांवर कस्टम ड्युटी वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Business Idea: कार नसतानाही करा OLA-Uberसोबत व्यवसाय; दरमहा कमवा बक्कळ पैसा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Banana Chips: वेफर्स खाताय सावधान! तुम्ही खाताय सडलेल्या केळीचे वेफर्स

Mumbai Ahmedabad Bullet Train: समुद्राखालून ३२० किमी वेगाने धावेल मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन, जाणून घ्य कसा असेल मार्ग

Shocking : ३१ वर्षांच्या तरुणाने केली हद्दपार, १००० महिलांसोबत शरीरसंबध, पण आता...; जगभरात होतेय चर्चा

NEET Exam: 'नीट'चं टेन्शन, विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन; विद्यार्थ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?

SCROLL FOR NEXT