Umar Khalid Saam Tv
देश विदेश

उमर खालिदला न्यायालयाचा मोठा धक्का; दिल्ली दंगल प्रकरणात जामीन अर्ज फेटाळला

विद्यार्थी नेता उमर खालिदला दिल्ली सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे.

वृत्तसंस्था

दिल्ली: विद्यार्थी नेता उमर खालिदला दिल्ली सत्र न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे. दिल्ली (Delhi ) दंगल प्रकरणी उमर खालिदचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळून लावला आहे. उमर खालिदवर दंगलीचा कट रचल्याप्रकरणी आणि UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. उमर खालिदच्या जामीन (Bail) याचिकेवर सुनावणी झाली. जामीन अर्जावर निर्णय कोर्टाने टाळला होता. यानंतर कोर्टाने (Court) आज निकाल सुनावला आहे. सत्र न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश अमिताभ रावत यांनी या जामीन अर्जावर निकाल दिला आहे.

हे देखील पहा-

जामीन अर्जावर सुनावणीच्या दरम्यान, सरकारी पक्षाकडे उमर विरोधामध्ये गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला आहे. तर, आरोपीकडून CAA आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या लोकांचा वापर हा शेळींच्या चाऱ्याप्रमाणे केला गेला आहे. CAA विरोधी आंदोलन हे मुख्यत: गरीब वस्त्याबाजूला आणि दाट लोकसंख्या (Population) असलेल्या ठिकाणी करण्यात आले असल्याचा मुद्दा सरकारी वकिलांनी (Lawyer) मांडला आहे.

उमर खालिदवर हे आहेत आरोप?

उमर खालिदसह अन्य लोकांविरोधामध्ये फेब्रुवारी २०२० रोजी दिल्लीमध्ये दंगल घडवल्याचा आरोप आहे. उमर आणि इतरांनी या दंगलीचा कट आखल्याचा ठपका त्यांच्याविरोधामध्ये ठेवण्यात आल्याने दहशतवादविरोधी कायद्यानुसार (UAPA) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिल्ली दंगलीमध्ये ५३ जण ठार झाले होते. तर, ७०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते. या दंगलीच्या माध्यमातून देशात उमरला अराजकता फैलावण्याचा आरोप उमरवर आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT