Ukraine Attack On Russia Saam Tv
देश विदेश

Russia Attack: युक्रेनचा रशियावर 9/11 सारखा हल्ला, 6 बिल्डिंगवर ड्रोन अटॅक; पाहा थरारक VIDEO

Ukraine Attack On Russia: युक्रेनने रशियातील कझान शहरावर 9/11 सारखा हल्ला केला. या ड्रोन हल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत.

Priya More

युक्रेन-रशियाचे युद्ध थांबयचे नाव घेत नाहीये. दोन्ही देश एकमेकांवर ड्रोन हल्ले करत आहेत. आता युक्रेनने पुन्हा रशियावर ड्रोन हल्ला केला. युक्रेनने रशियातील कझान शहरावर 9/11 सारखा हल्ला केला. या ड्रोन हल्ल्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील समोर आले आहेत. या हल्ल्याने रशिया हादरले. रशियामध्ये सध्या खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

युक्रेनने आज रशियाच्या कझान शहरावर हल्ला केला. रशियातील वेगवेगळ्या ठिकाणी युक्रेनने ड्रोन हल्ले केले. यामध्ये ६ रहिवासी बिल्डिंगचे मोठे नुकसान झाले आहे. ड्रोन हल्ल्यानंतर बिल्डिंग तात्काळ खाली करण्यात आल्या. त्यानंतर प्रशासनाकडून शाळांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आला. रशियातील एअरपोर्ट देखील बंद करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेन लष्कराने जवळपास ८ ड्रोनने ६ बिल्डिंगला लक्ष्य केले होते. सतत होत असलेल्या हल्ल्यांमुळे रशियातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कझान शहराच्या महापौरांनी नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगितले आहे. युक्रेनने डोनद्वारे कामलेव एवेन्यू, क्लारा जेटकिन स्ट्रीट, युकोजिस्काया, खादी तक्ताश आणि क्रास्नाया पॉजित्सिया या बिल्डिंगला लक्ष्य केले. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्यांबद्दल काहीच माहिती समोर आली नाही. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

रशियाच्या सुरक्षा एजन्सीशी संबंधित बाजा टेलिग्राम चॅनेलने या हल्ल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये ड्रोन उंच इमारतीला धडकल्याचे दिसत आहे. ड्रोन इमारतीवर धडकल्यानंतर भीषण आग लागल्याचे दिसत आहे. या हल्ल्यामध्ये इमारतीचे मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्यामागे यु्क्रेनचा हात असल्याचा आरोप केला आहे. युक्रेनने ही खूप मोठी चूक केल्याचे रशियाने म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: माऊलीच्या पालखीचं पुण्याहून सासवडकडे प्रस्थान

Saturday Horoscope: आर्थिक लाभाच्या संधी मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना पैसा जपून वापरण्याचा सल्ला; वाचा शनिवारचे राशीभविष्य

बोगस बियाण्यानंतर बोगस खतांचा साठा जप्त; राज्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सुरूच

पुरातून हत्तीने वाचवलं वाघाला? पाठीवर बसवून हत्तीने केली सुटका?

Bihar Politics: राज्यातील भाजपचं सरकार कोसळणार? नितीश कुमारांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं, बड्या नेत्याच्या दाव्यानं खळबळ

SCROLL FOR NEXT