Uk Parents Name Child As Pakora Saam Tv
देश विदेश

ब्रिटनच्या जोडप्यानं मुलाचे नाव ठेवले 'पकोडा'; कारण वाचून पोट धरून हसाल...

ब्रिटनच्या एका जोडप्याने अलीकडेच आपल्या मुलीचे नाव भारतीय पदार्थावरून ठेवण्याची घोषणा केली.

वृत्तसंस्था

Uk Parents Name Child As Pakora: अनेकदा आपण ऐकतो की पालक आपल्या मुलाचे नाव एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीच्या नावावर तर कोणी आपल्या मुलाचे नाव देवाच्या नावावरून ठेवतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की, पालकांनी आपल्या मुलाचे नाव खाण्याच्या पदार्थावर ठेवले आहे? हे प्रकरण ब्रिटनचे आहे.

या जोडप्याने अलीकडेच आपल्या नवजात मुलीचे नाव भारतीय पदार्थावरून ठेवण्याची घोषणा केली आहे. या मुलीचे नाव 'पकोडा' असे ठेवण्यात आले आहे. या पालकांनी आपल्या बाळाचे नाव 'पकोडा' ठेवले आहे कारण त्यांना हा भारतीय पदार्थ प्रचंड आवडला. मुलीचे नाव 'पकोडा' ठेवल्याची बातमी सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली असून लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करायला सुरुवात केली.

हे देखील पाहा -

आयर्लंडमधील न्यूटाउनबे येथील कॅप्टन टेबल या प्रसिद्ध रेस्टॉरंटने बिलसोबत मुलाचा फोटो शेअर केला आहे. या रेस्टॉरंटने फेसबुकच्या माध्यमातून सांगितले की, हे ब्रिटीश जोडपे येथे अनेकदा भेट देतात.त्यांनी आता त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये असलेल्या एका भारतीय पदार्थावरून त्यांच्या नवजात मुलाचे नाव ठेवले आहे. जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की हे भारतीय पदार्थ नेमके कोणती आहे तर त्याचे नाव 'पकोडे' आहे. रेस्टॉरंटच्या मालकाने 'पकोड्या'सह काही पदार्थांच्या नावांसह बिल पावतीचा फोटोही शेअर केला आहे.

सोशल मीडियावर लोक यावर खूप चर्चा करत आहेत. एका यूजरने यावर कमेंट करत लिहिले की, 'ही माझी दोन मुलं आहेत एकाचे नाव चिकन तर दुसऱ्याचे नाव टिक्का आहे. दुसर्‍या युजरने लिहिले, माझ्या गरोदरपणात खाण्यासाठी माझ्या आवडत्या गोष्टी म्हणजे केळी आणि टरबूज. देवाचे आभार मी माझ्या मुलांचे नाव केळी आणि टरबूज ठेवले नाही. तर आणखी एका युजरने आपल्या मुलाचा फोटो शेअर करत लिहिले, 'हे माझे बाळ आहे, त्याचे नाव चिकन बॉल आहे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिश्नोई गँगच्या नावाखाली राजकीय हत्या होणार? दसरा मेळाव्यानंतर राऊतांचा खळबळजनक दावा

District Bank Elections: राज्यात जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा; बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सर्वोच्च न्यायालयाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का; 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणुकीत बंदी

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

Dengue Fever : डेंग्यूचा सर्वाधिक धोका कोणाला? रुग्णसंख्या वाढण्यामागची कारणे

SCROLL FOR NEXT