LPG Gas Cylinder Price Today 1 March 2023  Saam Tv
देश विदेश

Ujjwala Yojana LPG Subsidy: मोदी सरकारची सामान्यांना मोठी भेट! एलपीजी सिलिंडरवर सबसिडीची घोषणा; तुम्हालाही लाभ मिळणार का?

Ujjwala Yojana Update: केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

LPG Subcidy News: केंद्रातील मोदी सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात ४% वाढ करण्याबरोबर सरकारने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना खुशखबरही दिली आहे. देशात करोडो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी जाहीर केली आहे. अशा प्रकारे या योजनेच्या कोटीहून अधिक लाभार्थ्यांसाठी अनुदानाचा कालावधी आणखी एक वर्षाने वाढवण्यात आला आहे. (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या अनुदानाची मुदत आणखी एक वर्षाने वाढवण्यात आली आहे. देशातील 9.60 कोटी लाभार्थ्यांना आता आणखी एक वर्षासाठी प्रति सिलिंडर 200 रुपये सबसिडी मिळणार आहे. तसेच लाभार्थी अनुदानावर 12 सिलिंडर घेऊ शकतात.

याबाबत माहिती देताना अनुराग ठाकूर म्हणाले की, "२०२२ मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एका वर्षात १२ सिलिंडर आणि एका सिलिंडरवर २०० रुपये सबसिडी (अनुदान) देण्याचा निर्णय घेण्यात आला असून आंतरराष्ट्रीय किमतीत कोणताही मोठा बदल नसल्यामुळे ही सबसिडी आणखी एक वर्ष वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे."

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम उत्पादनांच्या वाढलेल्या किमतीच्या पार्श्वभूमीवर सरकारने हे पाऊल उचलले आहे. अशा स्थितीत या उपक्रमाचा लाभ ९.६ कोटी कुटुंबांना आणखी एका वर्षासाठी घेता येईल. दरम्यान, सरकारच्या या निर्णयामुळे 1.6 कोटी कुटुंबांना फायदा मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Police : घातपाताचा उद्देशाने ताडगाव जंगल परिसरात माओवाद्याकडून रेकी; गडचिरोली पोलिसांनी घेतले ताब्यात

Ind Vs Pak सामना खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंना काळं फासणार, शिवसेना नेत्याचा इशारा

Maharashtra Politics: 'देवा तूच सांग' नाशिकमध्ये शरद पवार गटाने भाजपला डिवचले; शहरात 'या' बॅनरची चर्चा|VIDEO

India Vs Pakistan: थोड्याच वेळात महामुकाबला! सामन्यावर पावसाचे सावट? वाचा पिच रिपोर्ट काय सांगतो

Barvi Hills Tourism : कोकणची मजा बदलापूरमध्ये! मुंबईजवळचं Hidden Paradise, जंगल सफर, फोटोग्राफीची मजा एकाच ठिकाणी

SCROLL FOR NEXT