Fire Incident  Saam TV
देश विदेश

भयंकर घटना! अंध मुलांच्या शाळेला भीषण आग, ११ जणांचा होरपळून मृत्यू

युगांडात अंध मुलांच्या शाळेला भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला.

Satish Daud

युगांडा : एकीकडे भारतात दिवाळीचा (Diwali) सण उत्साहात साजरा केला जात असताना, दुसरीकडे आक्रिकेच्या युगांडा शहरात एक भयंकर घटना घडली. युगांडात अंध मुलांच्या शाळेला भीषण आग लागली. या घटनेत आतापर्यंत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातड़ीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Fire Incident Latest News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्देवी घटना मंगळवारी (२५ ऑक्टोबर) घडली. प्राप्त माहितीनुसार, युगांडा शहरातील मुकोनो परिसरात अंध मुलींची शाळा असून शाळेला लागूनच वसतीगृह सुद्धा आहे. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाळेला अचानक आग लागली.

बघता-बघता या आगीने रौद्ररूप धारण केलं. आगीची माहिती मिळताच, स्थानिकांनी शाळेकडे धाव घेत, विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढलं. मात्र, या घटनेत विद्यार्थ्यांसह तब्बल ११ जणांचा मृ्त्यू झाला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

दुर्घटनेचं हे ठिकाण कंपाला या राजधानीच्या शहरापासून पूर्वेला ३० किमी आहे. युगांडामध्ये शाळांना आगी लागणं ही आता सामान्य बाब झाली असून वसतिगृहांमध्ये बऱ्याचदा अशा आगी लागतात. बहुतेक आगी या दोषपूर्ण इलेक्ट्रिसिटी वायरिंगमुळे लागल्या असल्याचं अधिकारी सांगतात. तर काही आगा या देशात जाणूनबुजून लावल्याचंही नागरिक सांगतात.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

SCROLL FOR NEXT