Two terrorists killed near LoC Saam Tv News
देश विदेश

जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला, जवानांकडून २ दशतवाद्यांचा खात्मा

Two terrorists killed near LoC: गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत दोन दहशतवादी ठार. गोळीबारानंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण.

Bhagyashree Kamble

  • गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

  • घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत दोन दहशतवादी ठार

  • गोळीबारानंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण

  • यापूर्वी कुलगाममध्येही अशाच चकमकीत दोन दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीरच्या गुरेझ सेक्टरमध्ये भारतीय लष्कर आणि स्थानिक पोलिसांमध्ये दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून, नियंत्रण रेषेवर (एलओसी) घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात सुरक्षा दलांना यश मिळाले आहे. या कारवाईनंतर परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

श्रीनगरस्थित चिनार कॉर्प्सने सोशल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर पोलिसांना संभाव्य घुसखोरीबाबत माहिती मिळाली होती. गुप्त माहिती मिळाल्यानंतर संयुक्त कारवाई करण्यात आली. दरम्यान, सतर्क जवानांना संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यांनी घुसखोरांना आव्हान दिले. मात्र, दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरूवात केली.

प्रत्युत्तरादाखल लष्करांनी कारवाई करत दोन दहशतवाद्यांना ठार केले. यापूर्वीही २ ऑगस्ट रोजी कुलगाम जिल्ह्यातील अखल देवसर भागात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते. लष्करानं १ ऑगस्ट रोजी या भागांत ऑपरेशन अखल सुरू केले होते.

तब्बल १२ दिवस चाललेल्या या मोहिमेत ९ ऑगस्ट रोजी दोन जवान शहीद झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT