20 कोटीची लाॅटरी जिंकला भारतीय, पण विजेता गायब; जाणून घ्या कारण Saam TV
देश विदेश

20 कोटीची लाॅटरी जिंकला भारतीय, पण विजेता गायब; जाणून घ्या कारण

युएईमध्ये यावेळी एका भारतीय नागरिकानं कोट्यावधी रुपयांची लॅाटरी जिंकूनदेखील रक्कम घेण्यासाठी तो पोहोचलेला नाही.

वृत्तसंस्था

युएईमध्ये यावेळी एका भारतीय नागरिकानं कोट्यावधी रुपयांची लॅाटरी जिंकूनदेखील रक्कम घेण्यासाठी तो पोहोचलेला नाही. गेल्या अनेक दिवसांपासून त्याचा संपर्क होत नसून तो नेमका कुठे गेलाय याचा अनेक जण शोध घेत आहेत. चिंतेची बाब म्हणजे या व्यक्तीचा फोनच लागत नसून त्या व्यक्तीकडूनही कुणाला फोन येत नसल्याचं सांगितलं जात आहे. रविवारी या लकी ड्राचं आयोजन करण्यात आलं होतं. विजेत्या ठरलेल्या लकी डॅाचा नंबर होता 278109. ही लॅाटरी जिकंणारे नहील मुळचे केरळचे आहेत.

नहील यांचे दोन्ही मोबाईल नंबर सध्या बंद असून त्यांच्याशी कुठलाही संपर्क होत नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांच्या पहिल्या नंबरवर कॅाल केल्यानंतर नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर असल्याची सूचना ऐकू येते. एकदा इंग्रजीतून आणि एकदा मल्याळी भाषेतून ही सुचना ऐकवली जाते, तर दुसरा नंबर लागत नसल्याचं समोर आलं आहे. दोन्ही नंबर लागत नसल्याने नहील यांना संपर्क करायचा तरी कसा असा प्रश्न लॅाटरी कंपनीला पडला आहे. या लॅाटरीमध्ये दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या व्यक्तीही भारतीयच आहे.

25 सप्टेंबर रोजी खरेदी केलेल्या तिकीटाचा नंबर होता 000176. यापूर्वीदेखील दुबईतील राहणाऱ्या एका भारतीय प्रवाशाने 'महजूज मिलेनियर ड्रॉ'मध्ये सहभाग मोठी रक्कम जिंकली होती. एका रात्रीत ते कोट्यधीश झाले होते. लॉटरीची मुदत संपण्यापूर्वी केवळ काही तास अगोदर त्यांनी लॉटरी खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. मीर हे लॉटरी जिंकून कोट्यधीश होणारे 15 वे नागरिक ठरले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT