FDA : अन्नात भेसळ वाटतेय? आता घरबसल्या नोंदवा तक्रार; FDA ची QR Code सुविधा सुरू meta ai
देश विदेश

FDA : अन्नात भेसळ वाटतेय? आता घरबसल्या नोंदवा तक्रार; FDA ची QR Code सुविधा सुरू

food adulteration complaint : अन्नपदार्थांमध्ये भेसळ, अस्वच्छता किंवा विनापरवाना विक्री आढळल्यास नागरिकांना आता डिजिटल पद्धतीने तक्रार नोंदवता येणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्री तसेच औषधांशी संबंधित विविध तक्रारी या माध्यमातून नोंदवता येणार आहेत.

Saam Tv

सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त IAS तुकाराम मुंडे यांची राज्यभरात धडक कारवाई सुरू आहे. त्यामुळे बेपरवाना खाद्यपदार्थ विक्रेते आणि अस्वच्छ पद्धतीने खाद्यपदार्थ विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्यात देखील अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थांवरील नियम कडक केले आहेत. कर्नाटक अन्न व औषध प्रशासन विभागाने खाद्यपदार्थांच्या तक्रारीसाठी नागरिकांना QR Code ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. ज्यामुळे नागरिकांची तक्रार सहज आणि थेट आधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. हा उपक्रम सेंटर फॉर ई गव्हर्नन्सच्या सहकार्याने सुरू करण्यात आला आहे. यामुळे नागरिक आणि ग्राहकही QR Code स्कॅन करून अन्न व औषध संबंधित तक्रारी सहज नोंदवू शकतात.

औषधासंबंधी या तक्रारी तुम्ही नोंदवू शकता

  • औषधांचे होणारे साईड इफेक्ट्स

  • एखादे मेडिकल औषधांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त किंमत आकारत असेल तर तक्रार नोंदवू शकता.

  • मेडिकल मुदत संपलेले औषध विकत असेल तर त्याची तक्रार तुम्ही नोंदवू शकता.

  • इतर फार्मसी सेवांशी संबंधित तक्रारी

कोणत्या तक्रारी करू शकता?

  • ज्या ठिकाणी तुम्ही खाताय त्या ठिकाणी काही स्वच्छता नसेल, हायजीनचे नियम पाळत नसतील. डास, झुरळ, उंदीर यांचा प्रादुर्भाव असेल अशा ठिकाणाची तक्रार तुम्ही तक्रार करू शकता.

  • एखाद्या पदार्थात भेसळ असल्याची शंका आल्यास तक्रार नोंदवू शकता.

  • रस्त्यावर, फुटपाथवर अवैधरित्या, विनापरवाना अन्नपदार्थ विकणे सुरू असेल तर याची तक्रार तुम्हाला नोंदवता येईल.

ही सुविधा का सुरू करण्यात आली?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्यू आर कोडमुळे पारदर्शकता वाढणार आहे. नागरिकांना होणारा त्रास, तक्रार या क्यू आर कोड प्रणालीव्दारे थेट अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणे सहज शक्य होणार आहे. यामुळे तक्रारींवर किंवा संबंधित ठिकाणांवर तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे. याचसोबत डि फार्माच्या विद्यार्थ्यांसाठी ई -मार्क्स तर डी फार्मसी धारकांसाठी ई - सर्टिफिकेट सारख्या डिजीटल व्यवस्थेची सोय करण्यात आली आहे. ही सुविधा हॉटेल्स, रेस्टॉरंट, रस्त्यावरील खाद्यपदार्थ आणि शासकीय, खाजगी संस्था येथे उपलब्ध असेल.

अशी नोंदवू शकता तक्रार

अन्न सुरक्षा किंवा भेसळीसंबंधित तक्रार नोंदवण्यासाठी तुम्ही फूड सेफ्टी कनेक्ट या राष्ट्रीय अन्न सुरक्षा पोर्टलला भेट देऊ शकता. FSSAI शी संबंधित टोल फ्री क्रमांक १८००११२१०० किंवा व्हॉट्सअप नंबर ९८६८६८६८६८ यावर संपर्क साधू शकता.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT