Uttar Pradesh Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : धावत्या रेल्वेत ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार; टीसीसह एकाला अटक

धावत्या रेल्वेत एका ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

Satish Daud

Uttar Pradesh Crime News : उत्तरप्रदेशातील संभल जिल्ह्यातून एक संतापजक घटना समोर आली आहे. येथे धावत्या रेल्वेत एका ३२ वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. धक्कादायक बाब, रेल्वेतील टीसीनेच आपल्या मित्रांसोबत मिळून हे संतापजक कृत्य केलं. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी टीसीसह त्याच्या मित्राला अटक केली आहे. (Latest Marathi News)

राजू सिंह असं अटक करण्यात आलेल्या टीसीचं नाव आहे. सामूहिक अत्याचाराची ही खळबळजनक घटना चंदौसी रेल्वेस्थानकादरम्यान घडली. प्राप्त माहितीनुसार, पीडित महिला १६ जानेवारीला सुभेदारगंज, प्रयागराज येथे जाण्यासाठी आली होती. यावेळी महिलेकडे जनरल डब्याचं तिकीट होतं.

पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, स्टेशनवर उपस्थित असलेल्या टीसी राजू सिंहने पीडित महिलेला तुमचा लांबचा प्रवास आहे. मी तुम्हाला एसी कोचमध्ये जागा देतो, असं म्हणत एसी कोचमध्ये बसवलं. यानंतर रात्री तो पीडित महिलेला जेवणाची विचारणा करण्यासाठी आला. मात्र, जेवण करण्यास पीडितेने नकार दिला.

यानंतर टीसीने पीडित महिलेला शीतपेय पिण्यासाठी दिलं. ते पिताच महिला (Women) बेशुद्ध झाली. ट्रेनमध्ये सर्व झोपी गेल्याचा फायदा घेत टीसीने महिलेचे कपडे उतरवले आणि तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावरच न थांबता त्याने आपल्या मित्रांनाही महिलेवर बलात्कार करायला लावला. यादरम्यान, आरोपींनी महिलेचे नग्न व्हिडीओ देखील बनवले.

जेव्हा टीसीसह त्याचे मित्र महिलेवर अत्याचार (Crime) करत होते, तेव्हा महिलेला थोडीफार शुद्ध होती. मात्र, आपल्याला काहीच करता येत नसल्याचं पीडित महिलेनं आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे. या घटनेच्या पाच दिवसानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दाखल केली.तक्रार दाखल होताच, पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी टीसीसह एकाला अटक केली आहे.

सध्या एक आरोपी फरार असून  पोलीस (Police) त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे रेल्वेतील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, रक्षकच भक्षक बनल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.संभल जिल्ह्यात पंधरवड्यात रेल्वेत बलात्कार आणि विनयभंगाची ही दुसरी घटना आहे. ही बाब लक्षात येताच रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेत आरोपी टीटीईला निलंबितही केले.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supriya Sule : पोर्शे गाडी प्रकरणात बदनामी केल्यामुळे शरद पवारांना नोटीस; सुप्रिया सुळेंचा भरसभेत गौप्यस्फोट

6,6,6,6,6...द.आफ्रिकेत Sanju Samsonचं वादळ! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच भारतीय फलंदाज

IND vs SA 1st T20I: दक्षिण आफ्रिकेत संजू सॅमसन शो.. दमदार अर्धशतकासह मोडला मोठा रेकॉर्ड

Raj Thackeray Speech : सूरत-गुवाहाटी, पहाटेचा शपथविधी, शिवसेना; राज ठाकरेंची एकाच सभेत ठाकरे, पवार, शिंदे, फडणवीसांवर तोफ

Champions Trophy 2025: टीम इंडियाचा पाकिस्तानात जाण्यास नकार! या देशात होणार सामने

SCROLL FOR NEXT